पिसाळलेल्या लाडक्या बैलाने मालकाला रक्तबंबाळ करून मारलं! बदलापूर वालिवलीतील घटना, काही वेळात बैलाचाही मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पिसाळलेल्या लाडक्या बैलाने मालकाला रक्तबंबाळ करून मारलं! बदलापूर वालिवलीतील घटना, काही वेळात बैलाचाही मृत्यू

पिसाळलेल्या लाडक्या बैलाने मालकाला रक्तबंबाळ करून मारलं! बदलापूर वालिवलीतील घटना, काही वेळात बैलाचाही मृत्यू

Dec 19, 2024 02:19 PM IST

Owner killed due to bull attack in Badlapur : बदलापूर येथे पिसाळलेल्या बैलाने बैलगाडा मालकावर हल्ला करत त्याला रक्तबंबाळ केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

पिसळलेल्या लाडक्या बैलाने मालकाला रक्तबंबाळ करून मारलं! बदलापूर वालिवलीतील घटना, काही वेळात बैलाचाही मृत्यू
पिसळलेल्या लाडक्या बैलाने मालकाला रक्तबंबाळ करून मारलं! बदलापूर वालिवलीतील घटना, काही वेळात बैलाचाही मृत्यू

Owner killed due to bull attack in Badlapur : बदलापूर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे.  वालिवली गावात एका बैलाने आपल्याच  मालकावर हल्ला करत त्याचा जीव घेतला.  दरम्यान, मालकाचा मृत्यू झाल्यानंतर काही तासांत बैलाचा देखील  मृत्यू झाला आहे.  विजय म्हात्रे असं मृत्यू झालेल्या बैलाच्या  मालकाचे नाव आहे.  ते  शिक्षक आणि बैलगाडा मालक असून बदलापूर येथील एका खासगी शाळेत नोकरी करत होते. प्रेमाने वाढवलेल्या लाडक्या बैलामुळे त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना मंगळवारी घडली. 

 विजय म्हात्रे यांना  बैलगाडा शर्यतीची आवड होती. याकह आवडीतून त्यांनी  तीन वर्षांपूर्वी  बैलगाडा शर्यतीत धावणारा बैल विकत घेत पाळला होता. मात्र, हाच बैल त्यांचा काळ ठरला.  विजय यांनी मोठ्या लाडाने या बैलांचे संगोपन केले. ते बैलाला धावण्याच्या सरावासाठी त्यांच्या घराजवळील माळरानात  घेऊन जायचे. या सोबतच ते  स्वत:च बैलाची देखभाल देखील करायचे.  हा बैल विजय यांचा लाडका बैल होता.  

 विजय म्हात्रे हे मंगळवारी (दि १७) नेहमीप्रमाणे आपल्या बैलाला घेऊन सरावासाठी घराजवळील माळरानात गेले होते. सायंकाळी ५  वाजता त्यांनी बैलाचा सराव करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, रात्र झाली तरी ते घरी पोहोचले नाही. यामुळे त्यांच्या  कुटुंबीयांनी विजय यांचा शोध घेण्यासाठी माळरान गाठले. या ठिकाणचे दृश्य पाहून घरचे हादरले.  माळरानात विजय हे मृतावस्थेत आढळले तर त्यांच्या शरीरावर बैलाने हल्ला केल्याच्या अहेक खुणा होत्या. त्यांचं शरीर रक्तबंबाळ झालं होतं.   त्यांचा बैलही त्यांच्या बाजुलाच जमीनीवर पडला होता.

विजय यांच्या घरच्यांनी तातडीने त्यांना दवाखान्यात भरती केले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले होते. दरम्यान, घटनास्थळी विजय यांच्या घरच्यांनी बैलाची पाहणी केली. तेव्हा बैल हा नेहमी प्रमाणे वागत नव्हता. तो आक्रमक झाला होता. त्याने त्यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी जमलेल्या लोकांनी बैलावर ताबा मिळवण्यासाठी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळातच   बैलाचाही मृत्यू झाला.  

बैलाला घेतला होता कुत्र्याने चावा

या घटनेबाबत  विजय म्हात्रे यांचे शेजारी व  गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार  म्हात्रे यांच्या बैलाला काही दिवसांपूर्वी एका कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे त्याला  रेबीजची लागण झाली होती.  दरम्यान बैलाने विजय यांच्यावर कसा हल्ला केला याची  अधिकृत माहिती समोर आली नसून हा बैल  रेबीज झाल्यामुळे पिसाळला. यातूनच त्याने विजय यांच्यावर हल्ला केला. यात जकही झाल्याने विजय यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.  

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर