मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  buldhana rain : बुलढाण्याला वादळी वाऱ्याचा तडाखा, झोपाळ्यात झोपलेली चिमुकली घरावरील पत्र्यांसह हवेत उडाली!

buldhana rain : बुलढाण्याला वादळी वाऱ्याचा तडाखा, झोपाळ्यात झोपलेली चिमुकली घरावरील पत्र्यांसह हवेत उडाली!

Jun 12, 2024 04:32 PM IST

Buldhana News : वादळी वाऱ्याच्या तडाख्यात घरावरील पत्रे उडाले आणि त्यासोबतच चिमुकलीसह खांबाला बांधलेला झोपाळाही उडाला. यात चिमुकलीचा मृत्यू झाला.

बुलढाण्याला वादळी वाऱ्याचा  तडाखा
बुलढाण्याला वादळी वाऱ्याचा  तडाखा

Little girl dies due to storm in buldhana : महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. मोसमी वाऱ्याच्या आगमनाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज (बुधवार) बुलढाणा जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने तडाखा दिला. आज मान्सूनचा पहिलाच पाऊस बुलढाणा जिल्ह्यात दमदार बरसला. विजा व वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने मोठं नुकसानं झालं. या वादळामुळे बुलढाण्यात मोठी दुर्घटना घडली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव घुबे येथे हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घराच्याछतावरील पत्र्यांना आधार देण्यासाठी लावलेल्या खांबाला लहान मुलीसाठी झोपाळा बांधला होता. या झोपाळ्यात चिमुकली झोपली होती. पण वादळी वाऱ्याच्या तडाख्यात घरावरील पत्रे उडाले आणि त्यासोबतच चिमुकलीसह खांबाला बांधलेला झोपाळाही उडाला. साई भरत साखरे असं या चिमुकलीचं नाव आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा आणि चिखली तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसला. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आले.

देऊळगाव घुबे येथे घडलेल्या दुर्घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. छतावरील पत्र्यांना आधार देण्यासाठी लावलेल्या खांबाला झोका बांधण्यात आला होता. या झोपाळ्यात चिमुकली झोपली होती. मात्र वादळाच्या तडाख्यात पत्र उडले. पत्र्यांसोबत ही चिमुकली ज्या झोक्यामध्ये होती तो झोका हवेत उंच उडाला. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा अंदाज -

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गात आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, आणि गडचिरोली येथे वादळी पावसाचा इशारा देण्यात आला.

 

याशिवाय, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर येथे मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.

WhatsApp channel