राज्यात पुन्हा हिट अँड रनची घटना; रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या व्यक्तीला भरधाव कारने चिरडलं
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यात पुन्हा हिट अँड रनची घटना; रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या व्यक्तीला भरधाव कारने चिरडलं

राज्यात पुन्हा हिट अँड रनची घटना; रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या व्यक्तीला भरधाव कारने चिरडलं

Jul 02, 2024 04:24 PM IST

Buldhana hit and run : राष्ट्रीय महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये हिट अँड रनची ही घटना घडली असून परराज्यातील एका भरधाव कारने पादचाऱ्याला उडवले आहे.

बुलढाण्यात  हिट अँड रनची घटना
बुलढाण्यात हिट अँड रनची घटना

Buldhana hit and run case : पुणे आणि नागपूरनंतर राज्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटनासमोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात अपघाताचीही घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेने पायी जात असलेल्या एका व्यक्तीला पाठीमागून आलेल्याएका भरधाव कारने उडवले. यात व्यक्तीचा जागीचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. मात्र, या संपूर्ण अपघाताची घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरमध्ये हिट अँड रनची ही घटना घडली असून परराज्यातील एका भरधाव कारने पादचाऱ्याला उडवले आहे. अपघातानंतर कार चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान याप्रकरणी भारतीय न्याय संहितेनुसार जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव तुकाराम कवळे (वय ५८ वर्ष) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो पोलीस पाटील होते.

या भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. भरधाव गाडीच्या धडकेत व्यक्ती फुटबॉलसारखा हवेत उडाला. या घटनेत त्याचा जागीचा मृत्यू झाला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेल्या कुंड बुद्रुक येथे हा अपघात झाला. नामदेव कवळे मलकापूरकडे जात होते. कुंड बुद्रुक फाट्यावरून महामार्ग ओलांडून जात असताना हॉटेल यादगार नजीक त्यांना भरधाव वाहनाने उडवले. कार मुंबईवरून नागपूरकडे जात होते. हा वाहन गुजरातमधील होते.

धडक इतकी भीषण होती की, ते हवेत उडून जमिनीवर आपटले. त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांना जखमी नामदेव कवळे यांना मलकापूर उपजिल्हा रुग्णाल्यात दाखल केले. मात्र,रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

 

अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की,एका भरधाव कारने रस्त्यावर चालणाऱ्या वृद्ध व्यक्तीला उडवलं. ही कार गुजरात राज्यातील असल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातानंतर कार चालकाने व्यक्तीला उडवल्यानंतर गाडी न थांबवता भरधाव वेगाने घटनास्थळावरून निघून गेला. मलकापूर पोलीस कार चालकाचा पोलीस शोध घेत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर