मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Buldhana bus fire : बुलढण्यात भीषण अपघात; वऱ्हाड घेऊन जाणारी लक्झरी बस आगीत भस्मसात, ४८ प्रवासी थोडक्यात बचावले

Buldhana bus fire : बुलढण्यात भीषण अपघात; वऱ्हाड घेऊन जाणारी लक्झरी बस आगीत भस्मसात, ४८ प्रवासी थोडक्यात बचावले

Jun 25, 2024 10:09 AM IST

Buldhana accident : बुलढाणा जिल्ह्यात चिखली मेहकर रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. या मार्गावर एका खासगी लक्झरी बसने पेट घेतला असून यात ही संपूर्ण बस खाक झाली आहे. या बसमध्ये तब्बल ४८ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने थोडक्यात सर्व प्रवासी बचावले आहेत.

बुलढाण्यात भीषण दुर्घटना; वऱ्हाड घेऊन जाणारी ट्रॅव्हल बस आगीत भस्मसात; ४८ प्रवाशी थोडक्यात बचावले
बुलढाण्यात भीषण दुर्घटना; वऱ्हाड घेऊन जाणारी ट्रॅव्हल बस आगीत भस्मसात; ४८ प्रवाशी थोडक्यात बचावले

Buldhana accident : बुलढाणा जिल्ह्यात चिखली मेहकर रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. या मार्गावर एका खासगी लक्झरी बसने पेट घेतला असून यात ही संपूर्ण बस खाक झाली आहे. या बसमध्ये तब्बल ४८ प्रवासी प्रवास करत होते. या अपघात थोडक्यात सर्व प्रवासी बचावले आहेत. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही बस चंद्रपूर येथून वऱ्हाड घेऊन बुलढाणा येथे जात होती.

बुलढाणा जिल्ह्यात खासगी लक्झरी बसने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपूरवरुन वऱ्हाड घेऊन एक खासगी बस ही सोमवारी बुलढाणा येथे लग्नासाठी येत होती. या बसमध्ये तब्बल ४८ प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, चहा पिण्यासाठी चालकाने ही बस चिखली जवळील मेहकर फाटा येथील एका हॉटेल जवळ थांबली होती.  यावेळी बसमधून धूर येऊ लागला व अचानक संपूर्ण बसने पेट घेतला. पाहता पाहता काही वेळातच संपूर्ण बसला आगीने वेढले. बसला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला होता.

ट्रेंडिंग न्यूज

ही खासगी बस लग्नाचं वऱ्हाड घेऊन चंद्रपूरवरून बुलढाण्याला निघाली होती. मात्र, वाटेतच बसला भीषण आग लागली. ही आग नेमकी कशी लागली हे समजू शकले नाही. दरम्यान, ही आग शॉट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाचे कर्मचारी काही वेळातच घटनास्थळी आले. त्यांनी ही आग काही वेळात आटोक्यात आणली. या गाडीत प्रवाशांचे असलेले सर्व सामान व लग्नाचे सामान जळून खाक झाले आहे.

४८ प्रवाशांचा जीव वाचला

चंद्रपूर येथून लग्नाचं वऱ्हाड घेऊन ही बस बुलढाणा येथे येत होती.  प्रवाशांना चहापानासाठी ही बस चिखली मेहकर रस्त्यावर थांबवण्यात आली. सर्व प्रवासी बसमधून उतरून हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी अचानक गाडीतून धूर येऊन बसने पेट घेतला. ही गाडी धावती नव्हती. धावत्या गाडीत जर आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये, मात्र प्रवाशांचं संपूर्ण साहित्य जळून खाक झालं आहे. अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली.  मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता. या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

WhatsApp channel
विभाग