मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Buldhana Crime : बुलढाण्यात २६ लाख रुपयांचा गुटखा जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

Buldhana Crime : बुलढाण्यात २६ लाख रुपयांचा गुटखा जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 20, 2022 03:25 PM IST

राज्यात गुटखा बंदी असतांनाही गुटख्याची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे पोलिसांनी तब्बल २६ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

बुलढाणा येथे जप्त करण्यात आलेला गुटखा आणि अटक करण्यात आलेले आरोपी
बुलढाणा येथे जप्त करण्यात आलेला गुटखा आणि अटक करण्यात आलेले आरोपी

बुलढाणा : राज्यात गुटखा बंदी आहे. असे असतांनाही लाखो रुपयांचा गुटख्याची विक्री राज रोस पणे सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यात असाच विक्री साठी आणलेला २६ लाख रुपयांचा गुटखा आणि ट्रक असा एकूण ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

अजय लीलाधर गोसावी, सागर यशवंत औतार (दोन्ही रा. जळगाव खान्देश), गजानन मापारी (रा. लोणार) यांच्या विरुद्ध मेहकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव येथे प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांना बतमीदारांमार्फत मिळाली. अपर पोलीस अधीक्षक पथकाने पोलीस उपनिरिक्षक पंकज सपकाळे यांना जळगाव खान्देश येथून लोणार येथे एका ट्रकमधून अवैध गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. 

या माहितीची खातर जमा केल्यावर अप्पर पोलीस अधीक्षक पथकाने लोणार फाटा मेहकर येथे नाकाबंदी करुन ट्रक पकडला. या ट्रकची झडती घेतली असता त्यात २५ लाख ६३ हजार २०० रुपयांचा सुगंधी गुटखा, पान मसाल्याचा साठा आढळला. पोलिसांनी अवैध गुटखा आणि वाहन असा एकूण ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या नेतृत्वात पोउपनी पंकज सपकाळे आणि अपर पोलीस अधीक्षक पथकाने ही कारवाई केली.

WhatsApp channel

विभाग