Buldhana Accident : बुलढाणा येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेली दुचाकी रस्त्यावर बंद पडलेल्या बसला पाठीमागून जोरदार धडकली. या घटनेत दुचाकीचा चक्काचूर झळा असून त्यावरील तिघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील ही घटना चिखली ते मेहकर रस्त्यावरील वर्दडा फाट्यावर मंगळवारी रात्री घडली.
गोपाल पंढरी सुरडकर (वय २१, रा. बेराळा), धनंजय परमेश्वर ढंग (२५, रा. वाघापूर) आणि सुनील सुभाष सोनुने (रा. चिखली) अशी मृतांची नावे आहेत. थांबलेल्या बसला मोटारसायकल धडकली. यामुळे हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे. तिघांचेही मृतदेह ही शवविच्छेदनासाठी दावखण्यात पाठवण्यात आले आहे. बाईकच नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लव्हाळा चौकीपासून एक किमी अंतरावर वर्दडा फाटा आहे. या ठिकाणी चिखली आगाराची बस ही मंगळवारी दुपारी बंद पडली होती. ही बस दुरुस्त करण्याचे काम काही कर्मचारी करीत होते. यावेळी रात्री ७:३० च्या सुमारास लव्हाळा येथून गोपाल पंढरी सुरडकर, धनंजय परमेश्वर ढंग व सुनील सुभाष सोनुने हे तिघे मित्र दुचाकीने चिखलीकडे जात होते. यावेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची बाइक ही थेट बसवर आदळली. दुचाकीचा भरधाव वेगात असल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी जात तिघांना दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तिन्ही मृतदेह चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवन्यात आले आहेत.
दरम्यान, आणखी एका घटनेत प्रवासी वाहनावर दुचाकी धडकल्याने दोन जण गंभीर झाले. साखरखेर्डा येथून चिखलीकडे जात असलेल्या व्यापाऱ्यांची दुचाकी प्रवासी वाहनावर धडकल्याने हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या मार्गावर अपघात वाढले आहे. काही ठिकाणी रस्ते नादुरुस्त असल्याने अपघात होत आहे. यावर उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
संबंधित बातम्या