Buldhana Accident : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-जालना मार्गावर स्कॉर्पिओ गाडी पलटल्याने झालेल्या अपघातात ४ जण ठार झाले आहेत. या अपघातात ७ जण जखमी झाले आहेत. हळदी समारंभासाठी जाणाऱ्या कुटूंबीयांवर काळाने घाला घातला. खामगाव जालना महामार्गावर भरधाव स्कॉर्पिओ पलटल्याने ४ प्रवाशांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार चिखली तालुक्यातील अंबाशी येथील देशमुख कुटुंबीय जालना येथे हळदीच्या कार्यक्रमाला जात होते. त्यावेळी गाडी पलटल्याने हा अपघात झाला. चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण गमावल्यामुळे हा अपघात झाला. हा अपघात खामगाव जालना महामार्गावरील दगडवाडी गावाजवळ झाला. देऊळगावमही ते देऊळगावच्या दरम्यान हा अपघात झाला.
भरधाव गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे जखमींनी सांगितले. या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. ७ जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, देशमुख परिवारातील ८ सदस्य देऊळगाव राजा येथून हळदीच्या समारंभासाठी स्कॉर्पिओ वाहनाने जात होते. दगडवाडी नजीक भरधाव वेगातील वाहन अनियंत्रित झाल्याने रस्त्याकडेला पलटले. यामुळे वाहन रस्त्याखाली गेले. यातील तिघेजण जागीच ठार झाले तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्याला जालना येथे तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati sambhaji nagar) एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका तरूणाने जन्मदात्या बापाला संपवल्यानंतर आईचाही गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला.कर्जबाजारीला कंटाळून आरोपी मुलाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. मुलाने बापाचा खून केल्यानंतर आईलाही गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरातील डीलक्स पार्क येथे घडली.
श्रीकृष्ण पाटील (वय ६२ वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर रोहित श्रीकृष्ण पाटील असे हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे.