बुलढाण्यात हीट अँड रन! भरधाव वाहनाने दिली दुचाकीला धडक, भीषण अपघात तीन तरुणांचा जागीच मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बुलढाण्यात हीट अँड रन! भरधाव वाहनाने दिली दुचाकीला धडक, भीषण अपघात तीन तरुणांचा जागीच मृत्यू

बुलढाण्यात हीट अँड रन! भरधाव वाहनाने दिली दुचाकीला धडक, भीषण अपघात तीन तरुणांचा जागीच मृत्यू

Dec 14, 2024 10:53 AM IST

Buldhana Accident : बुलढाण्यातील अमडापूर येथे शुक्रवारी भीषण अपघात झाला. एका वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाला.

बुलढाण्यात हीट अँड रन! भरधाव वाहनाने दिली दुचाकीला धडक, भीषण अपघात तीन तरुणांचा जागीच मृत्यू
बुलढाण्यात हीट अँड रन! भरधाव वाहनाने दिली दुचाकीला धडक, भीषण अपघात तीन तरुणांचा जागीच मृत्यू

Buldhana Accident : बुलढाण्यातील अमडापूर येथे शुक्रवारी भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री हा अपघात झाला आहे. एका भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

मृतांमध्ये प्रतिक भुजे (वय २५), प्रथमेश भुजे (वय २६) आणि सौरभ शर्मा असे मृत्युमुखी पडलेल्या तीन तरुणांचे नाव आहे. यातील प्रतिक व प्रथमेश हे चुलत भाऊ होते. तर सौरभ हा दोघांचा मित्र होता. हे तिघे जण चिखलीहून उदयनगर येथे जात होते. यावेळी ते अमडापुर परिसरात आले असता, एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कसा झाला अपघात ?

बुलढाण्यात अमडापूर येथे शुक्रवारी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला आहे. वरील तिघे जण हे बुलढाण्यातील चिखलीहून उदयनगरकडे जात होते. हे तिघेही एकाच दुचाकीवरून जात होते. त्यावेळी अमडापूर रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर अज्ञात वाहनचालक हा फरार झाला. या घटनेची माहिती स्थानिकांना मिळाली. तेव्हा त्यांनी याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तिघांचे मृतदेह हे जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वाहनचालकाचा शोध सुरू करण्यात आला आहे.

सीसीटीव्हीच्या साह्याने आरोपीचा शोध सुरू

बुलढण्यात झालेल्या हिट अँड रन घटनेमुळे अमडापुर परिसरात खळबळ उडाली आहे. अमडापुर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाचा शोध सुरू केला आहे. यासाठी परिसरातील सीसीटीव्हीचा देखील शोध घेतला जात आहे. दोन भावांचा व त्यांच्या मित्राचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे आरोपीला अटक करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर