मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Buldana: रँगिगला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या, ऑडिओ क्लिपमुळे सत्य समोर, चौघांना अटक

Buldana: रँगिगला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या, ऑडिओ क्लिपमुळे सत्य समोर, चौघांना अटक

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 24, 2023 01:27 PM IST

Buldana Ragging: बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात रॅगिंगच्या त्रासाला वैगातून आयटीआयच्या विद्यार्थाने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

ITI Student Suicide Over Ragging
ITI Student Suicide Over Ragging

Buldana ITI Student Sucide: बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून आयटीआयच्या 18 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसतीगृहातील इतर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या त्रासाला वैतागून मृत तरूणाने आत्महत्या केल्याचा त्याच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक करण्यात आली आहे.

कैलास गायकवाड असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहेत. दरम्यान, १८ जानेवारीला कैलासने बुलढाण्यात खळबळ माजली आहे. रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची सांगितले जात आहे. वस्तीगृहावर काही विद्यार्थी कैलासचे कपडे काढत रॅगिंग करत असल्याचं त्याने आपल्या मामाला फोन करून सांगितले होते. एवढेच नव्हेतर, शिक्षकही विनाकारण त्याला शिवीगाळ करत असल्याची तक्रार कैलासने त्याच्या मामाकडे केली होती, याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे.

याच ऑडिओ क्लीपच्या आधारावर पोलिसांनी कारवाईला सुरुवात करत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्यात तीन विद्यार्थ्यांसह वस्तीगृह गृहपाल आणि एका शिक्षकाचा सुद्धा समावेश आहे. याप्रकरणी लोणार पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांसह वसतीगृह गृहपाल याला अटक केली आहे. या घटनेने बुलढाण्यात एकच खळभळ माजली आहे.

WhatsApp channel