मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Buldana Shocking: बुलढाणा हादरलं! गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाला अटक
Buldana Rape
Buldana Rape (HT_PRINT)

Buldana Shocking: बुलढाणा हादरलं! गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाला अटक

18 March 2023, 18:08 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Buldana Shocking: बुलढाण्यातील शेगाव येथे अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Buldana Rape: राज्यातील महिला आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाणा येथील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शेगाव येथे घडली असून पोलिसानी ५० वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश शेजाळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने शेगाव येथील १५ वर्षाच्या मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा पोलीसांनी आरोपीच्या अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

जळगाव: गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन जळगाव शहरातील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तीन जणांना अटक केली. या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विभाग