संभाजीनगर हादरलं! रात्री फिरत असताना नामांकित बिल्डरच्या मुलाचे अपहरण, काळ्या रंगाच्या कारमधून उचलून नेलं!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संभाजीनगर हादरलं! रात्री फिरत असताना नामांकित बिल्डरच्या मुलाचे अपहरण, काळ्या रंगाच्या कारमधून उचलून नेलं!

संभाजीनगर हादरलं! रात्री फिरत असताना नामांकित बिल्डरच्या मुलाचे अपहरण, काळ्या रंगाच्या कारमधून उचलून नेलं!

Published Feb 05, 2025 09:14 AM IST

Chhatrapati Sambhaji Nagar crime: छत्रपती संभाजी नगरात एक एका बड्या बिल्डरच्या ७ वर्षांच्या मुलाचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आहे. रात्री फिरत असतांना एका कारमधून आलेल्या आरोपींनी मुलाला उचलून नेलं.

संभाजीनगर हादरले! रात्री फिरत असतांना नामांकित बिल्डरच्या मुलाचे अपहरण, काळ्या रंगाच्या कारमधून येत नेलं उचलून
संभाजीनगर हादरले! रात्री फिरत असतांना नामांकित बिल्डरच्या मुलाचे अपहरण, काळ्या रंगाच्या कारमधून येत नेलं उचलून

Chhatrapati Sambhaji Nagar crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी रात्री एक मोठी घटना घडली आहे. येथील एका मोठ्या व प्रतिष्ठित बिल्डरच्या मुलाचे रात्री खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आहे. संबंधित बिल्डर हा रात्री जेवण झाल्यावर मुलासह फिरत होता. त्याचा मुलगा का सायकलवर मागून येत असतांना एका काळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या आरोपींनी त्याला उचलून नेले आहे. या प्रकरणी गुन्हा दखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. ही घटना ९ च्या सुमारास सिडको एन-४ मार्गावर घडली.

चैतन्य सुनील तुपे असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. सुनील तुपे हे औरंगाबाद येथील मोठे बिल्डर आहेत. ते मंगळवारी रात्री चैतन्य सोबत फिरत होते. यावेळी, त्यांच्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या सेंट्रल मॉल येथून त्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील तुपे व चैतन्य तुपे हे दोघे घराबाहेर पडले होते. जेवण झाल्यावर ते दोघे घराजवळ फिरत होते. यावेळी सुनील तुपे हे चालत पुढे गेले होते. तर चैतन्य हा सायकलवर मागून येत होता. यावेळी अचानक एक काळ्या रंगाची कारमधून आरोपी आले आणि सुनील तुपे यांच्या समोर चैतन्यचे अपहरण करून घेऊन गेले. कार मधून आलेले आरोपी हे आधी जयभवानीनगरकडे गेले व त्यानंतर सिडकोमार्गे शहराबाहेर पळून गेले अशी माहिती आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून या कारचा आणि आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले आहेत.

दोन कोटी रुपयांची मागितली खंडणी

आरोपींनी सुनील तुपे यांच्याकडे तब्बल २ कोटी रुपयांची खंडणी मागीतल्याचे समोर आलं आहे. मुलाचे अपहरण केल्यावर आरोपींनी त्यांना २० मिनिटांनी फोन केला. यात त्यांनी २ कोटीं रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे मिळाले नाही तर मुलगा जिवंत मिळणार नाही अशी देखील धमकी आरोपींनी दिली आहे. त्यांनी जगा आणि वेळ देखील कळवणार असल्याचे सांगितले आहे.

पोलिसांनी फोन ट्रेस केल्यानंतर तो सिल्लोडजवळ बंद झाल्याचे तपासात पुढे आले आहे. मुलाचे वडिल सुनील तुपे हे बिल्डर असून त्यांच्याशी संबंधित सर्व जणांनी देखील कसून चौकशी केली अंत आहे. या साठी पोलिसांनी ४ पथके स्थापन केली असून हे पथक आरोपींचा शोध घेत आहेत.

Ninad Vijayrao Deshmukh

TwittereMail

निनाद देशमुख हिंदुस्तान टाइम्स-मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून २०२२ पासून कार्यरत आहे. निनादने पुणे विद्यापीठातून एमए (जर्नलिझम) शिक्षण घेतले आहे. पुण्यातील केसरी वृत्तपत्रातून २००७ मध्ये बातमीदार म्हणून करियरची सुरूवात. २००९ ते २०२२ पर्यंत लोकमत, पुणे येथे वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केले. निनादला डिफेन्स, सायन्स, अंतराळ विज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण विषयांची विशेष आवड आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर