Akola Crime News : अकोल्यात एका आरोपीच्या पार्श्वभागात दांडा टाकून त्यांना गंभीर मारहाण करण्यात आली होती. यात या आरोपीचा कोठडीतच मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह पाच जनांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महीने हे प्रकरण दडपून ठेवण्यात आले होते. या प्रकरणी ठाणेदार तपण कोल्हें यांची बदली करण्यात आली असून त्यांच्यासह आणखी पाच पोलिस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. ठाणेदार कोल्हे यांची शनिवारी पोलीस नियंत्रण कक्षात तर इतर पाच जणांची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
गोवर्धन हरमकार या तरुणाला जानेवारी महिन्यात अटक एका किरकोळ गुन्हात अटक करण्यात अली होती. दरम्यान, पोलिसांनी त्याला कोठडीत बेदम मारहाण केली होती. त्याच्या पार्श्वभागात देखील दांडा टाकण्यात आला होता. या अमानुष मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. मृतकांच्या नातेवाईकांनी अकोट शहर पोलिसांवर गंभीर आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार हे कर्मचारी दोषी आढळले आहे. पोलीस उपनिरिक्षक राजेश जवरे, पोलिस कर्मचारी चंद्रप्रकाश सोळुंके यांच्यासह चौघापोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीएसआय राजेश जवरे आणि पोलीस कर्मचारी सोळुंके यांना अटक करण्यात आली आहे. तर अकोट पोलीस ठाण्यातील मनीष कुलट, विशाल हिवरे, सागर मोरे, प्रेमानंद पंचांग आणि रवि सदांशिव हे नॉटरीचेबल आहेत. या सर्व जणांची बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ही कारवाई केली असून या प्रकरणाचा तपास तपास सीआडी करीत आहे.
मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकार यांनी या प्रकरणी पोलीसांत तक्रार दिली आहे. गोवर्धनला अकोट शहर पोलिस ठाण्यातील पीएसआय राजेश जवरेसह आणखी तिघांनी एका किरकोळ गुन्हात ताब्यात घेतले. त्याला १६ जानेवारीला त्याच्या सुकळी या गावात नेत तयाची घरझड़ती घेतली गेली. मात्र, पोलिसांना काहीच मिळाले नाही. पोलिसांनी गोवर्धनसह फिर्यादी असलेले त्याचे काका सुखदेव यांनाही अटक केली होती. त्यांना १६ जानेवारीला रात्री पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. या दोघांना पोलिसांनी अमानुष मारहाण करण्यात केली. यात सुखदेव हरमकार यांना गंभीर दुखापत झाली होती. तर गोवर्धन बेशुद्ध पडला होता. अशा स्थितीत पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे आणि त्यांच्या साथीदारांनी मृतक गोवर्धनच्या पार्श्वभागात दांडा टाकून आमनुषतेचा कळस गाठला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात गोवर्धनला मृत घोषित करण्यात आले.
या मारहाणीत गोवर्धनच्या छातीची हाडे तुटली होती. गंभीर अवस्थेत त्यांना अकोटमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या दवाखान्यानं उपचारास नकार देत त्याला अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठवन्यात आले. अकोट ग्रामीण रुग्णालयाने त्याची गंभीर परिस्थिती पाहून पुढील उपचारासाठी त्याला अकोला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, जवरेच्या सांगण्यावरून त्याला अकोला जिल्हा रूग्णालयात भरती न करता पोलिस कारवाईच्या भीतीने अकोल्यातील एका खाजगी रूग्णालयात त्याला भरती करण्यात आले. मारहाणीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ जानेवारीला गोवर्धनचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. गोवर्धनच्या प्राथमिक एक्स-रे आणि वैद्यकीय कागदपत्रांनुसार त्याच्या छातीची हाडं तुटली होती, असा आरोपही मृत गोवर्धनच्या नातेवाईकांनी केला.
गोवर्धनचा मृत्यू झाल्यावर याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली नाही. त्याचे कुटूंबीय अकोल्यात आल्यानंतर त्यांना त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी त्याचा मृतदेह गावी नेण्याचा आग्रह धरला. मात्र, पोलिसांनी त्यांना धमकावत आमची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करू शकत नसल्याचे जबरदस्तीने लिहून घेतले. त्यानंतर अकोल्यात गरीब आणि अनोळखी मृतदेहावर अंत्यसंस्कार करीत असलेल्या संस्थेशी संपर्क साधून पोलिसांनी गोवर्धनवर अंत्यसंस्कार करत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.