Pune Crime : खळबळजनक! पुण्यात महिलेचा निर्घृण खून; डोकं, हात, पाय कापले अन् धड नदीपात्रात फेकले, खराडी येथे सापडले धड
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : खळबळजनक! पुण्यात महिलेचा निर्घृण खून; डोकं, हात, पाय कापले अन् धड नदीपात्रात फेकले, खराडी येथे सापडले धड

Pune Crime : खळबळजनक! पुण्यात महिलेचा निर्घृण खून; डोकं, हात, पाय कापले अन् धड नदीपात्रात फेकले, खराडी येथे सापडले धड

Aug 28, 2024 07:02 AM IST

Pune Kharadi Crime News: पुण्यात खराडी येथे नदीपात्रात एका महिलेचे शिर, हातपाय नसलेले धड सापडले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

खळबळजनक! पुण्यात महिलेचा निर्घृण खून; डोकं, हात, पाय कापले अन् धड नदीपात्रात फेकले, खराडी येथे सापडले धड
खळबळजनक! पुण्यात महिलेचा निर्घृण खून; डोकं, हात, पाय कापले अन् धड नदीपात्रात फेकले, खराडी येथे सापडले धड

Pune Kharadi Crime News: पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. खून दरोडे मारामारी या घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना पुन्हा उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणं हादरलं आहे. पुण्यात नदीपात्रात एका महिलेचा खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून नदी पात्रात फेकले. या महिलेचे धड खराडी येथील नदीपात्रात सापडले आहे. या महिलेचे अंदाजे वय ३० ते ५० असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस महिलेच्या इतर अवयवांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खराडी येथील नदीपात्राजवळ जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. येथील कामगारांना एका महिलेचा हात, पाय आणि डोके नसलेले धड तरंगत असल्याचं दिलसं. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत धड ताब्यात घेत ते उत्तरीय तपासणीसाठी ससुन रुग्णालयात पाठवलं. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. पण या महिलेचं वय अंदाजे, ३० ते ५० असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अज्ञात आरोपीने या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतून तिचे डोके व दोन्ही हात व पाय एका धारदार शस्त्राच्या साह्याने कापले. व तिचे धड ही मुळा-मुठा नदीपात्रात फेकून दिले.

दोन दिवसांपूर्वी खून

या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील बेपत्ता असलेल्या नागरिकांचा शोध घेऊन या महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या महिलेचा खून हा मृतदेह सापडण्यापूर्वी दोन दिवस आधी झाला असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे

दरम्यान, नाशिकच्या कलवण तालुक्यातही दोन मुलींचे मृतदेह सापडले आहेत. विहिरीमध्ये एकाच वेळी दोन मुलींचे मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. माधुरी मोरे व गीतांजली एखंडे असं मृत्यू झालेल्या दोन्ही मुलींची नावं आहे. माधुरीचं वय २० तर गीतांजलीचं वय १३ वर्ष आहे. कळवणच्या लिंगामे गावातील गोपीनाथ पालवी यांच्या शेतातील विहिरीत हे दोन्ही मृतदेह आढळून आले आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर