Pune Daund Crime News: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे. एका चुलत भावाने आपल्या अल्पवयीन चुलत बहिणीवर तिच्या घरात व एका फोटो स्टुडिओमध्ये बलात्कार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी ही गर्भवती राहिली असून तिला मुलगी झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, तिने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी भावावर व त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीवर वायरलेस फाटा आणि पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे आरोपींनी अनेक वेळा बलात्कार केला. यातील एका आरोपीचा दौंड तालुक्यात एक फोटो स्टुडिओ आहे. या स्टुडिओत व पीडितेच्या घरी आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. हा सर्व प्रकार गेल्या वर्षी मार्च ते जून महिन्यात घडला.
तब्बल वर्षभर तिच्या भावाने व त्याच्या साथीदाराने तिचावर अत्याचार केले. ही घटना कुणाला सांगितल्यास तिला मारण्याची धमकी देखील आरोपींनी दिली. दरम्यान, या लैंगिक संबंधातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. व तिने बाळाला जन्म दिला. यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारी नुसार या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पीडित मुगली ही दौंड तालुक्यातील गिरीम येथे राहते. आरोपींनी तिच्यावर वायरलेस फाटा व पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे राहणाऱ्या दोन आरोपींनी बलात्कार केला. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता. धायरी येथे राहणारा आरोपी हा पीडित तरुणीचा चुलत भाऊ आहे. पीडित मुलगी अल्पवयीन आहे, हे माहीत अतसाता देखील त्यांनी तिच्यावर अत्याचार केले. दुसऱ्या एका आरोपीचा दौंड तालुक्यातील गिरीम येथील वायरलेस फाटा येथे फोटो स्टुडिओ आहे. या स्टुडिओत देखील आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला. पीडित मुगली ही गर्भवती राहिली असून तिने एका मुलीला जन्म दिला आहे. तिने हा प्रकार कुणाला सांगितला तर तिला मारण्याची धमकी देखील आरोपींनी तिला दिली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींना बारामती येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने त्यांना, दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास दौंड पोलिस करत आहेत.
संबंधित बातम्या