विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या बहीण भावाला भाऊबीजेच्या दिवशी अग्निशमन दलाने दिले जीवदान; पुण्यातील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या बहीण भावाला भाऊबीजेच्या दिवशी अग्निशमन दलाने दिले जीवदान; पुण्यातील घटना

विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या बहीण भावाला भाऊबीजेच्या दिवशी अग्निशमन दलाने दिले जीवदान; पुण्यातील घटना

Nov 04, 2024 12:40 PM IST

Pune wanwadi news : पुण्यात वानवडी येथे एका बहीण भावाने घरात स्वत:ला कोंडून घेत विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या बहीण भावाला पुणे अग्निशामक दलाने वाचवले आहे.

विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या बहीण भावाला भाऊबीजेच्या दिवशी अग्निशमन दलाने दिले जीवदान; पुण्यातील घटना
विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या बहीण भावाला भाऊबीजेच्या दिवशी अग्निशमन दलाने दिले जीवदान; पुण्यातील घटना

Pune wanwadi news : पुण्यात रविवारी सर्वत्र भाऊबीजेचा सण साजरा होत असतांना एक धक्कादायक घटना घडली. नैराश्यात असलेल्या भाऊ आणि बहिणीने आईला व्हिडीओ कॉल करत आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. यानंतर घरात स्वत:ला कोंडून घेत विष प्राशन केलं. या घटनेची माहिती आईने पोलिसांना दिली. पोलिसांनी अग्निशामक दलाला ही माहिती दिल्यावर अग्निशामक दलाच्या पथकाने तातडीने घरी जाऊन घराचा दरवाजा तोडून या बहीण भावाचे प्राण वाचवले. त्यांना रुबि हॉल येथे अॅडमिट करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

पुण्यात रविवारी भाऊबीज साजरी करण्यात आली. सर्व जण हा सण साजरा करत असतांना वानवडी येथील विकास नगरातील कृष्ण कन्हैया सोसायटीत दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेत राहणाऱ्या भाऊ व बहिणीने टोकाचे पाऊल उचललं. त्यांनी आईला व्हिडिओ कॉल केला. यावेळी ते नैराश्यात असल्याने जीवन संपवत असल्याचं त्यांनी त्यांच्या आईला संगीतलं. या घटनेमुळे आई घाबरली. तिने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी देखील या घटनेची गंभीरतेने दखल घेत तातडीने अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. रात्री १०.३० वाजता अग्निशामक दलाला याची माहिती मिळाली. बीटी कवडे रस्ता व कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

दोघांनी केले होते विष प्राशन 

अग्निशामक दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. यावेळी दोघांनी फ्लॅटचा दरवाजा यातून बंद केला असल्याचे आढळले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जवानांनी तातडीने विलंब न करता डोअर ब्रेकर, कटावणी, पहार यांच्या साह्याने सुमारे दहा मिनिटातच फ्लॅटचा दरवाजा तोडला व अंत मध्ये प्रवेश केला. यावेळी १९ वर्षीय भाऊ व २४ वर्षीय बहीण ही बेशुद्ध असल्याचं आढळलं. जवानांनी तातडीने अग्निशमन दलाच्या वाहनातूनच त्यांना जवळच असलेल्या रुबि हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार झाल्याने दोघांचेही प्राण वाचले आहे. 

हे दोघेही लवकरच बरे होतील असे डॉक्टरांनी सांगितले. दिवाळी सणात भाऊबीजेच्या दिवशी उचित वेळेत केलेली कामगिरी भाऊ व बहिणेचे प्राण अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांमुळे वाचू शकले. ही कामगिरी अग्निशामक दलाचे वाहनचालक दत्ता अडाळगे, सत्यम चौंखडे तसेच जवान सुभाष खाडे, सागर दळवी, निलेश वानखेडे, श्रेयस मेटे, महेश पांडे, सुरज हुलवान, हर्षवर्धन खाडे, अनुराग पाटील, रितेश मोरे यांनी पार पाडली. कुटुंबीयांनी या सर्वांचे आभार मानले आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर