British-Indian drives 18,300 km from London to Thane : आई आणि मुलाचं नातं अतूट असतं. अनेक जण कामानिमित्त घराबाहेर असतात. कामामुळं त्यांना सारखं घरी जाणं शक्य होत नसतं. मात्र, एका ब्रिटिश-भारतीय व्यक्तीनं आईच्या भेटीच्या ओढीनं एक दोन हजार नाही तर तब्बल १८,३०० किमीचा प्रवास केला. या व्यक्तिनं त्याच्या एसयूव्ही कारने लंडन ते ठाणे दरम्यानचा प्रवास अनेक विघ्न पार करून आईची भेट घेतली आहे. आईच्या प्रेमापोटी त्यांनी केलेला हा प्रवास सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या या प्रवासाचे कौतुक केले आहे.
भारतीय वंशाचे ब्रिटीश नागरिक, विराजित मुंगळे यांनी आपल्या आईला भेटण्यासाठी लंडन ते ठाणे हा १८,३०० किमीचा प्रवास तब्बल ५९ दिवसांत पूर्ण केला. हा प्रवास त्यांनी त्यांच्या एसयूव्ही गाडीतून केला. विशेष म्हणजे त्यांनी हे मोठे अंतर एकट्याने कापले. ऐतिहासिक सिल्क रूटचा वापर त्यांनी या प्रवासाठी केला. या प्रवासा दरम्यान त्यांनी १६ देशांना भेटी देत भारतात येण्यासाठी त्यांच्या सीमा ओलांडल्या. मुंगळे यांचा मित्र रोशन श्रेष्ठासोबत त्यांनी नेपाळपर्यंत जाऊन प्रवासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मीवळल्या. या साहसपूर्ण प्रवासाठी त्यांनी कामातून दोन महिन्यांची सुट्टी घेतली.
विराजित मुंगळे यांनी लंडन ते ठाणे हे १८३०० किमीचे अंतर ५९ दिवसांत कापले. सिल्क रूट मार्गे त्यांनी १६ देशांना भेटी दिल्या. मुंगळे यांना त्यांच्या आईला भेटायचे होते. मात्र, त्यांनी थेट हवाई मार्गाने न येता त्यांनी लंडन ते ठाणे असा रस्त्याने प्रवास करत भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लंडन ते ठाणे हा प्रवास ५९ दिवसांत पूर्ण केला. हा प्रवासात त्यांनी त्यांची एसयूव्ही गाडी एकट्याने चालवली. प्रवासात त्यांनी यूके, फ्रान्स, जर्मनी, रशिया, चीन आणि भारतासह १६ देशांमधून प्रवास केला.
या प्रवासासंदर्भात पीटीआयशी बोलतांना मुंगळे म्हणाले, ऐतिहासिक सिल्क रूटमुळे व या मार्गावरील साहसपूर्ण प्रवासांच्या कथामुळे या प्रवासाची प्रेरणा मिळाली. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी रोज अंदाजे ४००-६००० किमी गाडी चालवली. तर काही वेळा १००० किमीचा प्रवासाचा टप्पा देखील गाठला. रात्रीचे ड्रायव्हिंग टाळून दिवसा प्रवास करत सुरक्षिततेला प्राधान्य दिले. या प्रवासाठी प्रत्येक देशाच्या परवानग्या आणि कायदेशीर मंजुरीची बारकाईने व्यवस्था केली व प्रवासासाठी नोकरीतून दोन महिन्यांची सुट्टी घेतली. काठमांडू, नेपाळ पर्यंत नेपाळी मित्र रोशन श्रेष्ठासोबत, मुंगळे यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले, ज्यात ५,२०० मीटर उंचीवरील आजार आणि अत्यंत प्रतिकूल हवामानाचा समावेश आहे.
बर्फ आणि थंडीमुळे हा प्रवास खडतर होता, पण अनुभव मोलाचा होता,” मुंगळे यांनी सांगितले. मुंगळे यांच्या मार्गात यूके, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, पोलंड, लिथुआनिया, लॅटव्हिया, एस्टोनिया, रशिया, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, चीन, तिबेट, नेपाळ आणि भारत असा प्रवास त्यांनी केला. मुंगळे म्हणाले की ते विमानाने यूकेला परतणार आहेत आणि त्यांची एसयूव्ही पाठवणार आहेत.
संबंधित बातम्या