नाश्ताही महागणार! ब्रेडच्या किंमतीत २ ते ५ रुपयांची वाढ; जिभेच्या चोचल्यांना बसणार महागाईचे चटके
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नाश्ताही महागणार! ब्रेडच्या किंमतीत २ ते ५ रुपयांची वाढ; जिभेच्या चोचल्यांना बसणार महागाईचे चटके

नाश्ताही महागणार! ब्रेडच्या किंमतीत २ ते ५ रुपयांची वाढ; जिभेच्या चोचल्यांना बसणार महागाईचे चटके

Published Oct 10, 2024 09:48 AM IST

Bread Price Hike : देशात महागाईने कळस गाठला आहे. सर्वसामान्यांना या महागाईमुळे जीवन जगणं कठीण झालं आहे. आधी तेलाच्या किमती वाढल्या होत्या. त्यात आता सर्व सामान्यांचं खाद्य असलेला ब्रेडच्या किमती आता २ ते ५ रुपयांनी वाढल्या आहेत.

नाश्ताही महागणार! ब्रेडच्या किंमतीत २ ते ५ रुपयांची वाढ; जिभेच्या चोचल्यांना बसणार महागाईचे चटके
नाश्ताही महागणार! ब्रेडच्या किंमतीत २ ते ५ रुपयांची वाढ; जिभेच्या चोचल्यांना बसणार महागाईचे चटके (Freepik)

Bread Price Hike : मुंबईकरांचा सकाळचा नाश्ता आता महाग झाला आहे. यापूर्वी अंडी ७८ ते ७४ रुपये प्रति डझनने महाग झाले होते. तर लोणी ५८ रुपयांवरून ६० रुपये प्रति १०० ग्रॅमवर ​​पोहोचले होते. त्यानंतर आता ब्रेडच्या किमती वाढल्या आहेत. स्लाईड ब्रेडच्या किमतीत २ ते ५ रुपयांची वाढ झाली आहे. २५०-३५० ग्रॅम वजनाच्या पांढऱ्या ब्रेडच्या पावाची किंमत आता ३८ रुपयांवरून ४० रुपये झाली आहे. तर ब्राऊन ब्रेडचे किंवा गव्हापासून बनलेल्या ब्रेडची किमत ही ५० वरून ५५ रुपये झाली आहे. यात तब्बल ५ रुपयांची वाढ झाली आहे.

पांढऱ्या ब्रेडच्या ६५० ग्रॅमच्या मोठ्या पावाची किंमत पूर्वी ६० होती. त्यात पाच रुपयांची वाढ झाली असून आता हे दार ६५ रुपये झाले आहे. ही दरवाढ या आठवड्यात लागू केली जाणार आहे. सँडविच विक्रेत्यांद्वारे वापरली जाणारी सर्वात मोठी ८०० ग्रॅमचा ब्रेड हा ७५ रुपयांवरून ८० रुपयांपर्यंत वाढला आहे, असे मुंबईतील प्रमुख ब्रेड वितरक सुकुमार नाडर यांनी सांगितले.

बेकर्स असोसिएशनचे या दारवाढीवर म्हटले आहे की मैदा सारख्या कच्च्या मालाची आणि प्रामुख्याने चरबी आणि तेलाची किंमत वाढल्याने ब्रेडची किमती देखील वाढल्या आहेत. क्वालिटी बेकर्सचे संचालक आणि इंडिया बेकर्स असोसिएशनचे मुख्य सदस्य सलाहुद्दीन खान म्हणाले, "रिफाईंड पीठ, खाद्यतेल आणि विशेषतः बेकिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या मालाची किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. खाद्यतेलाच्या आयात शुल्कात नुकत्याच झालेल्या वाढीमुळे देखील किमती वाढल्यामुळे बेकरी उद्योगाला मोठा फटका बसला आहे.

इंग्लिश ओव्हन ब्रँडचे झोनल सेल्स मॅनेजर प्रदिप घोगरे म्हणाले, दररोज मोठ्या प्रमाणात मैदा, साखर, यीस्ट आणि इतर संसाधने बेकरी पदार्थ प्रामुख्याने ब्रेड तयार करण्यासाठी वापरले जातात. मूलभूत कच्च्या मालाची किंमत वाढल्याने बेकरी उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे कंपन्यांचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळेच मुंबई बेकरी असोसिएशनने ब्रेडच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

राजवीर ब्रँडचे वर्किंग पार्टनर उमेश करिरा म्हणाले, "गव्हाचे पीठ २० टक्यांनी महागले आहे. तर मैदा देखील २९ टक्यांनी महाग झाला आहे. तुलनेने आमची दरवाढ केवळ ५ टक्के आहे. शिवाय वीज, स्वयंपाकाच्या गॅससह इंधन व्यतिरिक्त वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलचा समावेश आहे. मागील दरवाढ ही सप्टेंबर २०२३ मध्ये झाली होती. तेव्हा देखील २ ते ८ रुपयांची दरवाढ झाली होती. मात्र, ब्राऊन ब्रेडच्या किमती वाढल्या नव्हत्या. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे यात सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर