पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला लॉजवर बोलवून तिची हत्या केल्यानंतर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडच्या खराळवाडी परिसरातील हॉटेल राज प्लाझामध्ये ही घटना घडली. प्रेयसीची चाकूने वार करून हत्या केल्यानंतर प्रियकराने लॉजच्या खोलीतच गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
नितेश नरेश मिनेकर आणि करिश्मा इश्वर घुमाने असं या मृत प्रेमी युगुलाचं नाव आहे. प्रियकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रेयसीला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पिंपरीमधल्या खराळवाडीत असलेल्या हॉटेल राज पॅलेस या लॉजवर गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. चार वाजण्याच्या सुमारास या दोघांनी लॉजवर रूम बुक केली होती. मात्र त्यानंतर त्यांच्या खोलीतून भांडणाचे आवाज येऊ लागल्यानंतर लॉजमधील कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हॉटेलच्या रूमचा दरवाजा ठोठावला. आतमधून नितेशचा प्रतिसाद येत होता. तो म्हणत होता की, थोडा वेळ थांबा माझ्या अंगावर कपडे नाहीत, कपडे घालतो व दरवाजा उघडतो. बराच वेळ झाला तरी नितेश दरवाजा उघडत नसल्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. आतील दृष्य पाहून त्यांना धक्का बसला. करिश्मा रक्ताच्या थोराळ्यात पडली होती तर नितेशने गळफास लावून आपले जीवन संपवले होते.
जखमी अवस्थेत तिला पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून नेमका या दोघांमध्ये कशावरून वाद झाला? याचा तपास पोलीस करत आहेत.
संबंधित बातम्या