वडगावशेरी येथे पैगंबर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हाय टेन्शन वायरचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू-boy died of electrocution after a flag rod hit a high tension wire during a procession three injured pune vadgaon sheri ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  वडगावशेरी येथे पैगंबर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हाय टेन्शन वायरचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

वडगावशेरी येथे पैगंबर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हाय टेन्शन वायरचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

Sep 22, 2024 02:31 PM IST

Pune Vadgaon Sheri : वडगावशेरी येथे आज सकाळी १० च्या सुमारास पैगंबर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हाय टेन्शन वायरचा धक्का लागल्याने एका तरुणाचा भाजून मृत्यू झाला.

वडगावशेरी येथे पैगंबर जयंती निम्मित काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हाय टेन्शन वायरचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू
वडगावशेरी येथे पैगंबर जयंती निम्मित काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हाय टेन्शन वायरचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

Pune Vadgaon Sheri news : पुण्यातील वडगाव शेरी येथे धक्कादाक घटना घडली आहे. आज सकाळी पैगंबर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डिजेवर चढून झेंडा फडकवत असतांना हाय टेन्शन वायरचा धक्का लागल्याने एका तरुणाचा भाजून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत आणखी तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. या घटनेमुळे येथील मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभय वाघमारे (वय १७) असे मृत्यु पावलेल्या युवकाचे नाव आहे. आज सकाळी १० च्या सुमारास वडगाव शेरी येथील भाजी मंडई परिसरात पैगंबर जयंती निमित्त मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. ही मिरवणूक वडगाव शेरी भाजी मंडई परिसरात आली. यावेळी अभय वाघमारे व त्याचे काही मित्र डिजे असलेल्या ट्रक्टरवर बसले होते. ट्रॅक्टरवर उभे राहून हे तरुण झेंडा फडकवत होते. यावेळी अचानक वर असलेल्या हाय टेंशन वायरला झेंड्याचा लोखंडी रॉड लागला. यामुळे त्यातून वीजप्रवाह उतरून या तरुणाच्या शरीरात शिरला. यामुळे हा तरुण अक्षरक्ष: जळाला.

यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. वाघमारेसह असलेले इतर तिघांना देखील वीजेचा धक्का बसला. ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पुढील तपास करत आहेत.

परिसरातील सर्व मिरवणुका रद्द

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. येथील इतर मिरवणुका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Whats_app_banner
विभाग