मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Coastal Road Project : मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाबाबत मोठी अपडेट, ‘बो-स्ट्रिंग गर्डर ब्रिज’ टाकण्याचा निर्णय

Coastal Road Project : मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाबाबत मोठी अपडेट, ‘बो-स्ट्रिंग गर्डर ब्रिज’ टाकण्याचा निर्णय

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 15, 2023 11:23 AM IST

Coastal Road Project Mumbai : मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्प नोव्हेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार तसेच बीएमसीचे प्रयत्न सुरू आहे.

mumbai coastal road project current status
mumbai coastal road project current status (HT)

mumbai coastal road project current status : मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोड प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कोस्टल रोड मार्गावरील उत्तरेकडील बाजूस 'बो-स्ट्रिंग गर्डर ब्रिज' उभारला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. हाय-स्पीड कॉरिडॉरला वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्यासाठी बो स्ट्रिंगचा वापर केला जाणार आहे. सुलभ वाहतूक आणि रोड कनेक्टिव्हीटी सुधारण्यासाठी बीएमसीकडून मार्गावर ब्रिज उभारला जाणार आहे. पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रोजेक्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. कोस्टल रोड प्रोजेक्ट हा प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरपासून सुरू होणार असून बीडब्ल्यूएसएल जवळ संपणार आहे.

कोस्टल रोड प्रोजेक्टमध्ये अनेक भूमिगत बोगदे, छोटे इंटरपास, वाहतूक इंटरचेंज आणि फ्लायओव्हर्स असणार आहे. त्यासाठी सुरुवातीला ५० मीटर अंतरावर मोनोपाइल्स बांधले जाणार होते. परंतु मुंबईतील अनेक मासेमारी संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला होता, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोनोपाइल्समधील अंतर १२० मीटर पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बीएमसीने अनेक खांब काढून टाकले होते. परंतु त्यामुळं पुलाच्या संरचनेला धोका पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर आता यावर पर्याय म्हणून 'बो-स्ट्रिंग गर्डर ब्रिज' उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीटपासून सुरू होणारा हा मार्ग गिरगाव चौपाटीजवळ संपणार आहे. या सागरी महामार्गासाठी तब्बल चौदा हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यासाठी हाजी अली ते वरळीपर्यंत समुद्रात भराव टाकण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. कोस्टल रोड प्रकल्पात पार्किंग आणि बागेसाठीही जागा तयार केली जाणार आहे.

IPL_Entry_Point