ज्वारी खाण्याचे कोणकोणते फायदे? ज्वारीचे विविध आयाम उलगडून दाखवणाऱ्या ‘ज्वारीची कहाणी’चे प्रकाशन
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  ज्वारी खाण्याचे कोणकोणते फायदे? ज्वारीचे विविध आयाम उलगडून दाखवणाऱ्या ‘ज्वारीची कहाणी’चे प्रकाशन

ज्वारी खाण्याचे कोणकोणते फायदे? ज्वारीचे विविध आयाम उलगडून दाखवणाऱ्या ‘ज्वारीची कहाणी’चे प्रकाशन

HT Marathi Desk HT Marathi
Dec 09, 2024 05:23 PM IST

ज्वारीचं पीक हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे. तसेच ज्वारी हा आस्थेचा विषय देखील आहे. या पिकाला मध्यवर्ती ठेवून धनंजय सानप यांनी ‘ज्वारीची कहाणी’ हे पुस्तक लिहिलं आहे.

ज्वारी पिकाचे विविध आयाम उलगडून दाखवणाऱ्या ‘ज्वारीची कहाणी’चे प्रकाशन
ज्वारी पिकाचे विविध आयाम उलगडून दाखवणाऱ्या ‘ज्वारीची कहाणी’चे प्रकाशन

टेक्नॉलॉजी, इनोव्हेशनच्या जोरावर आर्थिक प्रगती साधायची. दुसऱ्या बाजूला मानवाशी परस्परसंबंधित जे पैलू आहेत. त्याचा समाजावर काय परिणाम होतो, या गोष्टीचं आकलन होण्यासाठी त्यासंबंधी साहित्य निर्मिती होणं आवश्यक असतं. आपल्या परिसरातील समस्यांचं प्रतिबिंब साहित्यात उतरतं. त्यासाठी साहित्य निर्मिती गरजेची आहे. भौतिक विकासासोबत मानवी विकास होणंही, आवश्यक आहे, असं मत ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केलं. धनंजय सानप लिखित 'ज्वारीची कहाणी' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी, साहित्य आणि शिक्षण फेलोशिपचं महत्त्व अधोरेखित केलं.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या शरद पवार इंस्पायर फेलोशिपमधून 'ज्वारीची कहाणी'ची आकारास आले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे नुकताच शरद पवार इंस्पायर फेलोशिप प्रदान सोहळ्यात ज्वारीची कहाणीचे प्रकाशन फेलोशिपचे प्रमुख डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, एमकेसीएलचे विवेक सावंत, डॉ. चारूदत्त माई, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे विलास शिंदे, साहित्य फेलोशिपचे समन्वयक प्रा. नितीन रिंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. नितीन रिंढे यांनी 'ज्वारीची कहाणी' पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेची पार्श्वभूमी सांगितली. रिंढे म्हणाले, ज्वारीचं पीक महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे. तसेच आस्थेचा विषयदेखील आहे. या पिकाला मध्यवर्ती ठेवून धनंजय सानप यांनी पुस्तक लिहिलं आहे. या संशोधनासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. यातून ज्वारी पिकाचे विविध आयाम उलगडून दाखवण्यात आले आहेत. लेखकाने फेलोशिप अंतर्गत देण्यात येणाऱ्या संसाधानाचा चांगला वापर केला आहे, असंही रिंढे यांनी सांगितलं.

ज्वारी पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. परंतु त्याचं मूल्यवर्धन झालं तर शेतकरी त्याला पसंती देतील असा विश्वास सह्याद्रीचे विलास शिंदे यांनी व्यक्त केला. शिंदे म्हणाले, शेतीकडे आता आपण उद्योग म्हणून बघायला हवं. ज्वारीचं पीक दिवसेंदिवस कमी होत. त्यामुळं ज्वारीच्या मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती होणं गरजेचं आहे. आज मक्यातून किंवा ज्वारीतून अशी पदार्थ तयार झाले तर शेती क्षेत्रात आर्थिक क्रांती घडवून येऊ शकते. त्याची जबाबदारी शेती क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांची आहे. त्या दिशेने फेलोशिप अंतर्गत काम करणाऱ्या तरुणांचं कौतुक वाटतं, असंही शिंदे म्हणाले.

Whats_app_banner