Bakri Eid : रहिवासी सोसायटीत विनापरवानगी कुर्बानी चुकीची, हायकोर्टाचे निर्देश-bombay high court say kurbani without permission in residential societies is wrong ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bakri Eid : रहिवासी सोसायटीत विनापरवानगी कुर्बानी चुकीची, हायकोर्टाचे निर्देश

Bakri Eid : रहिवासी सोसायटीत विनापरवानगी कुर्बानी चुकीची, हायकोर्टाचे निर्देश

Jun 28, 2023 11:46 PM IST

Bombay high court on Kurbani : रहिवासी संकुलात विनापरवानगी कुर्बानी देणं चुकीचं असल्याचं महत्त्वपूर्ण निरिक्षण मुंबई हायकोर्टानेनोंदवलं आहे.

Bombay high court
Bombay high court

मुंबईतील मीरारोडमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत बकऱ्यांच्या कुर्बानीवरुन वादंग निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेपी इन्फ्रा या सोसायटीत हा प्रकार घडला होता. या प्रकरणी हायकोर्टाने तातडीची सुनावणी घेत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. 

रहिवासी संकुलात विनापरवानगी कुर्बानी देणं चुकीचं असल्याचं महत्त्वपूर्ण निरिक्षण मुंबई हायकोर्टानेनोंदवलं आहे. राज्य सरकारसह पालिका प्रशासनालाही कारवाईचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. नागपाडा पोलिसांना याप्रकरणी तातडीने कारवाई करत योग्य तो बंदोबस्त देण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.

रहिवासी संकुलात खुल्या जागेत कुर्बानी देण्यास विरोधकरणारी याचिकाहायकोर्टात दाखल करण्यात आली होती. हरेश जैन आणि अपेक्षा शाह या गिरगावातील दोन रहिवाशांनीहीयाचिका दाखल केली होती. खुल्या जागेत जनावरांची कुर्बानी दिल्यामुळे अनेक प्रकारचं प्रदूषण होतं तसंच आजार पसरण्याचा धोका असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. तक्रार करूनही स्थानिक पोलीस दाद देत नसल्यामुळे हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती.

दरम्यान मीरारोडमध्ये जेपी इन्फ्रा मोहसीन शेख यांनी बकरी ईदनिमित्त सोसायटीत दोन बकरे आणले होते. ही बाब सोसायटीत समजल्यानंतर सोसायटीतील काही लोकांनी सोसायटीत एकत्र येत निषेध केला. बकऱ्याला बाहेर काढा अशी सोसायटीतील लोकांनी मागणीकेली.या गदारोळात लोकांनी हनुमान चालिसा पठणही सुरू केलं आणि जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.

 

घटनेची माहिती मिळताच काशिमीरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तिथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी पोलिसांनी रहिवाशांची समजूत काढली आणि राग शांत केला. यात सोसायटीतील रहिवासी आणि पोलिसांमध्ये थोडी बाचाबाचीही झाली. या प्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल झालेत.

विभाग