वांद्रे स्थानक- कलानगर स्कायवॉकचे बांधकाम सुरू; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बीएमसी अॅक्शनमोडमध्ये
Bomabay High Court: वांद्रे स्थानक (पूर्व) ते कलानगर येथील पदाचारी पुल पुन्हा उभारण्यात यावा, असे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
BMC: वांद्रे रेल्वे स्थानक- कलानगर स्कायवॉक बांधकाम प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी पार पडली. नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे. तसेच नागरिकांना चालण्यासाठी सुरक्षित पदपथ नसणे आणि त्यामुळे दुर्घटना होऊन एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणे, हे नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असेही उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
वांद्रे स्थानक (पूर्व) ते कलानगर येथील म्हाडा कार्यालयाकडे जाणारा हा पादचारी पुल २००८ मध्ये उभारण्यात आला होता. मात्र, हा पादचारी पुल सुरक्षित नसल्याचे निदर्शनास येताच महापालिकेने २०१९ मध्ये हा पादचारी पुल जमिनदोस्त केला. मात्र, यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने हा पदाचारी पुल लवकरात लवकर उभारण्यात यावा, अशी याचिका वकील के. पी. पी. नायर यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली. या पदाचारी पुलाचा वापर करताना नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि गैरसोयची कोणताही तक्रार आली नव्हती, असा दावाही याचिकेतून करण्यात आला आहे.
या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. वांद्रे रेल्वे स्थानक ते म्हाडा कार्यालयाच्या दिशेने दररोज लाखो लोक ये-जा करतात. या ठिकाणी फक्त पदपथ उपलब्ध आहे. ज्यामुळे या परिसरात सतत वर्दळ असते. तसेच वाहनांचीही प्रचंड गर्दी असल्यामुळे बरेच अपघात होतात. पदपाथ नागरिकांच्या सुरक्षितेसाठी आणि कोणत्याही अडचणींविना वावरण्यासाठी असतो. यामुळे मुंबई महानगरपालिकेने वांद्रे स्थानक- कलानगर येथील पादचारी पुल नागरिकांच्या सोयीसाठी पुन्हा उभारावे, असे मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले.