Bombay High court gave order to release minor accused in Pune Porsche Accident case : पुण्यातील कल्याणीगर पोर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट आली आहे. मुंबई हाय कोर्टाने अल्पवयीन आरोपीला दिलासा देत जामिनावर मुक्त करण्याचे आदेश न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने दिले आहेत. एकदा जमीन दिल्यावर पुन्हा त्याला कोठडीत ठेवणे म्हणजे बेकायदेशीर कृत्य असल्याचे सांगत कोर्टाने त्याला बालसुधारगृहाच्या कोठडीतून सोडण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी मुलाची आत्या पूजा जैननं यांनी हेबियस कॉर्पसअंतर्गत हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका हायकोर्टाने स्वीकारली आहे.
या याचिकेवर आज मुंबई हाय कोर्टात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान, अल्पवयीन आरोपीला २२ मे, ५ जून १२ जून रोजी बालहक्क न्यायालयाने आदेश देत अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात ठेवणे अवैध होते. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून अल्पवयीन आरोपीला तातडीने सोडण्याचे आदेश दिले आहेत.
आत्याने केलेल्या याचिकेत अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहे. मुलगा १७ वर्ष ८ महिन्यांचा असून तो अल्पवयीनच आहे. तो सध्या बालसुधारगृहात आहे. या ठिकाणी त्याची काळजी घेतली जात नसल्याचे मुलाच्या आत्याने म्हटले आहे. तसेच या बाल सुधारगृहात काहीही सुविधा नाहीत व मुलाच्या जीवाला देखील धोका असून मुलाचे आई, वडील, नातेवाईक सर्व तुरुंगात आहे, त्यामुळे आत्या पूजा जैन यांची याचिका कोर्टाने स्वीकारली आहे.
पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पालकांचे सांत्वन केलं. तसेच, झालेली घटना दुर्दैवी असून दोषींना लवकरात लवकर कठोर शासन केलं जाईल, असं आश्वासन दिले. या सोबतच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत देखील जाहीर केली होती.
संबंधित बातम्या