अल्पवयीन पत्नीसोबत संमतीने ठेवलेले लैंगिक संबंध हा सुद्धा बलात्कारच; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अल्पवयीन पत्नीसोबत संमतीने ठेवलेले लैंगिक संबंध हा सुद्धा बलात्कारच; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

अल्पवयीन पत्नीसोबत संमतीने ठेवलेले लैंगिक संबंध हा सुद्धा बलात्कारच; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Nov 15, 2024 04:18 PM IST

Bombay High Court: अल्पवयीन पत्नीसोबत संमतीने ठेवलेले लैंगिक संबंध देखील बलात्कारच आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

अल्पवयीन पत्नीसोबत संमतीने ठेवलेले लैंगिक संबंध देखील बलात्कारच- मुंबई उच्च न्यायालय
अल्पवयीन पत्नीसोबत संमतीने ठेवलेले लैंगिक संबंध देखील बलात्कारच- मुंबई उच्च न्यायालय

Law Commission of India: संमतीने अल्पवयीन पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवल्यास संबंधित व्यक्तीविरोधात बलात्काराच गुन्हा दाखल करता येऊ शकतो, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. तसेच न्यायालयाने आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे. आरोपीच्या वकिलाने युक्तिवाद केला की,  पीडिता त्याच्या पत्नी असून तिच्याशी ठेवलेले लैंगिक संबंध सहमतीने होते. अशा परिस्थितीत याला बलात्कार म्हणता येणार नाही. गोविंद सानप यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

१२ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशात न्यायाधीशांनी म्हटले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कायद्यानुसार याचिकाकर्त्यांना पीडित पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवणे बलात्कार किंवा लैंगिक हिंसा मानले जाणार नाही, हे मान्य केले जाऊ शकत नाही. १८ वर्षांखालील मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे बलात्कारच आहे. मग ती विवाहित असो किंवा नाही.’

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लक्षात घेता या खटल्यात पत्नीशी सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. दोघांमध्ये कथित विवाह झाला असे गृहीत धरले तरी पीडितेने तिच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवल्याचा केलेला आरोप लक्षात घेता तो बलात्कार ठरेल.

९ सप्टेंबर २०२१ रोजी वर्धा जिल्ह्यातील कनिष्ठ न्यायालयाने या तरुणाला पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवले होते. आता या आदेशाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर याचिकाकर्त्याला २५ मे २०१९ रोजी अटक करण्यात आली. त्यावेळी मुलगी ३१ आठवड्यांची गरोदर होती. या दोघांचे प्रेमसंबंध होते आणि चाचिकाकर्त्याने तिच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले आणि लग्नाचे खोटे आश्वासन देऊन ते सुरू ठेवले, असा युक्तिवाद पीडितेने केला.

गरोदर राहिल्यानंतर पीडितेने आरोपीला तिच्याशी लग्न करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्याने घर भाड्याने घेऊन शेजाऱ्यांच्या उपस्थितीत तिच्याशी लग्न केले. त्यानंतर आरोपीने पीडिता आपली पत्नी असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आरोपीने पीडिताकडे गर्भपात करण्यासाठी आग्रह धरला. मात्र, पीडितेने याचा नकार देताच आरोपीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.  त्यावेळी पीडिताच्या लक्षात आले की आरोपीने लग्नाचे नाटक करून तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले.

कनिष्ठ न्यायालयात झालेल्या उलटतपासणीत पीडितेने बालकल्याण समितीकडे तक्रार केल्याची कबुली दिली आहे. तसेच छायाचित्रांचा हवाला देत तो तिचा पती असल्याचे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. आता याआधारे  याचिकाकर्त्याने हे लैंगिक संबंध सहमतीने असल्याचे म्हटले होते. 'माझ्या मते हा युक्तिवाद मान्य न करण्याची एकापेक्षा जास्त कारणे आहेत. गुन्ह्याच्या वेळी पीडिताचे वय १८ वर्षांपेक्षा कमी होते, हे सरकारी पक्षाने सिद्ध केले आहे. न्यायालयाने आरोपीची याचिका फेटाळून लावली.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर