मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Non Veg ads: मांसाहारी जाहिरातींचा त्रास होत असेल तर टीव्ही बंद करा; कोर्टाने याचिकाकर्त्यास झापले

Non Veg ads: मांसाहारी जाहिरातींचा त्रास होत असेल तर टीव्ही बंद करा; कोर्टाने याचिकाकर्त्यास झापले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 26, 2022 07:08 PM IST

Mumbai High Court Non Veg Issue: टीव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या मांसाहाराच्या जाहिरातींमुळे जैन समाजाच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत असल्याने काही जैन संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली.

Bombay High Court
Bombay High Court

मुंबई : टीव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या मांसाहाराच्या जाहिरातींमुळे जैन समाजाच्या शांततेत जगणण्याच्या मूलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा आरोप करत काही जैन संघटनांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या जाहिराती बंद करण्यात याव्या अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. मात्र, कोर्टाने याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारले आहे. टीव्हीवरील या जाहिरातींचा त्रास होत असले तर टीव्ही बंद करा असे म्हणत कोर्टाने सुनावत याचिका फेटाळून लावली आहे.

टीव्ही, इंटरनेट, वर्तमान पत्रे आदी माध्यमातून मोठ्या प्रमाणात मांसाहाराच्या जाहिराती करण्यात येतात. या जाहिरातीमुळे जैन समाजाच्या मूलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा आरोप काही जैन संघटनांनी केला होता. यामुळे या जाहिराती बंद करण्यात याव्या यासाठी मुंबई उच्च न्यायालयात श्री ट्रस्टी आत्म कमल लब्धीसुरीश्वरजी जैन ज्ञानमंदिर ट्रस्ट, सेठ मोतीशा धर्मादाय ट्रस्ट आणि श्री वर्धमान परिवार आणि ज्योतींद्र शाह यांनी याचिका दाखल केली होती.

या जाहिराती म्हणजे प्राणी हत्तेला प्रोत्साहन आहे असा दावा त्यांनी याचिकेत केला होता. हे कायद्याचे आणि प्राण्यांच्या हक्काचे उल्लंघन आहे असा आरोपही करण्यात आला होता. अशा जाहिराती या गुजरात, उत्तर प्रदेश उत्तराखंड या राज्यांनी बंद केल्याचे याचिकेत म्हटले होते. याच धर्तीवर महाराराष्ट्रात देखील या जाहिराती बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी झाली. मात्र, ही याचिक कोर्टानं फेटाळून लावली आहे. मुंबई हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारत तुम्हाला जर जाहिरातींचा त्रास होत असेल तर तुम्ही टीव्ही बंद करा असे म्हणत ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे. ही याचिका न्यायालयाने फेटाळली असून पुन्हा याचिका दाखल करण्याची मुभादेखील कोर्टाने दिली आहे. देण्यात आली आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या