मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुराव्याशिवाय पतीला मद्यपी अन् व्यभिचारी म्हणणे क्रूरता, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

पुराव्याशिवाय पतीला मद्यपी अन् व्यभिचारी म्हणणे क्रूरता, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 25, 2022 04:28 PM IST

पुराव्याशिवाय एखाद्या महिलेने आपल्या पतीला मद्यपी आणि व्यभिचारी म्हणणेही क्रूरता आहे,असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

पतीला मद्यपी अन् व्यभिचारी म्हणणे क्रूरता
पतीला मद्यपी अन् व्यभिचारी म्हणणे क्रूरता

कोणत्याही पुराव्याशिवाय एखाद्या महिलेने आपल्या पतीला मद्यपी आणि व्यभिचारी म्हणणेही क्रूरता आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.कोर्टाने आपल्या निर्णयात कौटुंबिक न्यायालयाचा तो आदेश कायम ठेवला आहे. ज्यात विवाह रद्द करण्याचे म्हटले होते.

न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने ५० वर्षीय महिलेची याचिका फेटाळून लावली. महिलेने आपल्या याचिकेत पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. कौटुंबिक न्यायालयाने नोव्हेंबर २००५ मध्ये हा आदेश दिला होता. महिलेचा विवाह लष्करी अधिकाऱ्याशी झाला होता. हायकोर्टात केस चालली होती, त्याच दरम्यान पतीचाही मृत्यू झाला होता.

महिलेने दावा केला होता की तिचा पती मद्यपी आणि चारित्र्यहीन आहे,त्यामुळे तिला वैवाहिक जीवनाचे मूलभूत अधिकारही दिले गेले नाहीत. या महिलेने कोणत्याही पुराव्याशिवाय पतीच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न करून समाजात त्याची प्रतिमा मलिन केली आहे, त्यामुळे हे प्रकरण क्रुरतेचे आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे. न्यायालयाने सांगितले की, महिलेने तिच्या आरोपांना पुष्टी देण्यासाठी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत.

त्याचवेळी महिलेच्या दिवंगत पतीची बाजू मांडणाऱ्या वकिलाने सांगितले की,अशा आरोपांमुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. उच्च न्यायालयाने म्हटले की, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मानसिक छळ इतका होतो की तो एकत्र राहण्याची हिंमत करत नाही, तेव्हा त्याला क्रूरता म्हणून वर्गीकृत केले जाते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग