Chhota Rajan : गँगस्टर छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; जन्मठेपेची शिक्षा रद्द, जामीनही केला मंजूर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chhota Rajan : गँगस्टर छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; जन्मठेपेची शिक्षा रद्द, जामीनही केला मंजूर

Chhota Rajan : गँगस्टर छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; जन्मठेपेची शिक्षा रद्द, जामीनही केला मंजूर

Oct 23, 2024 12:35 PM IST

Gangster Chhota Rajan gets bail : ३० मे २०२४ रोजी विशेष मोक्का न्यायालयाने छोटा राजनसह इतरांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

गँगस्टर छोटा राजनला  ‘उच्च’  दिलासा; जन्मठेपेची शिक्षा रद्द, जामीनही केला मंजूर
गँगस्टर छोटा राजनला ‘उच्च’ दिलासा; जन्मठेपेची शिक्षा रद्द, जामीनही केला मंजूर

Gangster Chhota Rajan gets bail : गँगस्टर छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. २००१ मध्ये हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. ३०  मे २०२४  रोजी विशेष मोक्का न्यायालयाने राजनसह इतरांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी राजनची शिक्षा रद्द करावी तसेच त्याला जामीन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. बुधवारी न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलका भरण्याचे आदेश देत छोटा राजनची जन्मठेपेची शिक्षा रद्द करत त्याला जामीन मंजूर केला आहे.   

  हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजनच्या जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगित केली आणि त्याला जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे.  न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने छोटा राजनला जामिनासाठी एक लाख रुपयांचा मुचलका भरण्याचे आदेश दिले. छोटा राजन मात्र इतर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये तुरुंगातच राहणार आहे. विशेष न्यायालयाने मे महिन्यात हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात राजनने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ही शिक्षा स्थगित करण्यात यावी आणि मध्यंतरी त्याला जामीन देण्यात यावा, अशी मागणी छोटा राजनच्या वकिलाने केली होती. 

कोण होते जया शेट्टी?

मध्य मुंबईतील गामदेवी येथील गोल्डन क्राऊन हॉटेलच्या मालकीच्या जया शेट्टी यांची ४ मे २००१ रोजी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर छोटा राजनच्या टोळीतील दोन कथित सदस्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.  जया शेट्टी यांना छोटा राजन टोळीचा सदस्य हेमंत पुजारी याच्याकडून खंडणीचे फोन आले होते आणि पैसे न दिल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.  क्राइम रिपोर्टर जे. डे यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला राजन सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर