Suraj Chavan: आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सूरज चव्हाण यांना जामीन, वर्षभरानंतर कारागृहातून सुटका
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Suraj Chavan: आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सूरज चव्हाण यांना जामीन, वर्षभरानंतर कारागृहातून सुटका

Suraj Chavan: आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सूरज चव्हाण यांना जामीन, वर्षभरानंतर कारागृहातून सुटका

Feb 04, 2025 01:05 PM IST

BMC Khichdi Scam: मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे सूरज चव्हाण यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला.

आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सूरज चव्हाण यांना जामीन
आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सूरज चव्हाण यांना जामीन

Suraj Chavan Granted Bail: मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) आज (०४ फेब्रुवारी २०२४) जामीन मंजूर केला. न्यायाधीश मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. सूरज चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली असून ते १७ जानेवारी २०२४ पासून तुरुंगात आहेत. वर्षभरानंतर चव्हाण यांची कारागृहातून सुटका होणार आहे.

सूरज चव्हाण यांना १७ जानेवारी २०२४ रोजी कोरोना काळातील खिचडी घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली. तेव्हापासून ते तुरुंगात होते. सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने चव्हाण यांची याचिका मान्य करून अखेर त्यांना जामीन मंजूर केला.चव्हाण यांनी अटकेला आणि त्यानंतर सुनावण्यात आलेल्या कोठडीला आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे प्रलंबित आहे.

न्यायालायाने काय म्हटले?

न्यायालयाने अधोरेखित केले की, चव्हाण यांनी आधीच एक वर्षापेक्षा जास्त काळ कोठडीत घालवला आहे आणि नजीकच्या भविष्यात खटला पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले. न्यायमूर्ती जाधव यांनी सांगितले की, जर अर्जदाराची कोठडी आणखी सुरू राहिली तर ते भारतीय संविधानाच्या कलम २१ अंतर्गत त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होईल, जे जलद खटला आणि वैयक्तिक स्वातंत्र्याची हमी देते.

नेमके प्रकरण काय?

महाविकास आघाडी सरकारने करोना महामारीच्याकाळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. मुंबई महानगरपालिकेच्या एकूण ५२ कंपन्यांना खिचडीचे कंत्राट देण्यात आले होते. त्यावेळी चार महिन्यात चार कोटींची खिचडी वाटप करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली होती. मात्र, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या खिचडी वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप केला, यात सूरज चव्हाण यांचे नाव पुढे आले. याप्रकरणात सूरज चव्हाण यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी चव्हाण यांच्या खात्यात ३७ लाख रुपये जमा झाल्याचे निरदर्शनास आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. याबाबत चव्हाण यांना विचारणा केली असता फोर्सवन नामक कंपनीचे कर्मचारी असल्याने त्यांना पगार म्हणून हे पैसे मिळाल्याचे सांगितले. याप्रकरणी ईडीने तक्रार दाखल करून चव्हाण यांना अटक केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर