विमान व रेल्वेत स्फोट होणार असल्याची धमकी देत कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला करणीभूत ठरलेल्या आरोपी जगदीश उईकेला अटक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विमान व रेल्वेत स्फोट होणार असल्याची धमकी देत कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला करणीभूत ठरलेल्या आरोपी जगदीश उईकेला अटक

विमान व रेल्वेत स्फोट होणार असल्याची धमकी देत कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला करणीभूत ठरलेल्या आरोपी जगदीश उईकेला अटक

Nov 03, 2024 07:57 AM IST

Bomb Threats to Airlines and Railway : मुंबई, पुणे विमानतळावर विमानात तसेच रेल्वेत बॉम्बस्फोट होणार असल्याचे निनावी फोन व मेल पाठवणाऱ्या आरोपी जगदीश उईकेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने तब्बल ३६ मेल पोलिस यंत्रणेला पाठवले.

विमान व रेल्वेत स्फोट होणार असल्याची धमकी देत कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला करणीभूत ठरलेल्या आरोपी जगदीश उईकेला अटक
विमान व रेल्वेत स्फोट होणार असल्याची धमकी देत कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला करणीभूत ठरलेल्या आरोपी जगदीश उईकेला अटक (HT)

Bomb Threats to Airlines and Railway accused arrested : राज्यातील विमानतळ व रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचे निनावी फोन व ईमेल करून पोलिस यंत्रणांना वेठीस धरून कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला करणीभूत ठरणाऱ्या जगदीश उईकेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी उईकेने तब्बल ३६ वेळा बॉम्बस्फोट होईल अशी खोटी माहिती त्यानं दिली होती. त्याच्या या खोट्या महितीमुळे विमान कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. धक्कादाक म्हणजे आरोपीने पुस्तक लिहिले असून ते प्रकाशीत व्हाव या साठी त्याने ही खोटी माहिती दिल्याचे पोलिसांना सांगितलं आहे. पोलिसांनी त्याचे लॅपटॉप आणि मोबाइल फोन जप्त केले असून विविध अंगांनी या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

. राज्यात गेल्या काही दिवसांपासून विमानात बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे पोलिसांनी विमानाचे उड्डाण थांबवून तपासणी केली होती. यामुळे अनेक उड्डाणे उशिरा झाली होती. तर काही रद्द करण्यात आली होती. यामुळे विमान कंपन्यांचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, निनावी माहिती देणाऱ्या व यंत्रणांना वेठीस धरणाऱ्या आरोपीच्या शोधत पोलिस यंत्रणा होत्या. फोन व ईमेलचा तपास करून आरोपी हा जगदीश उईके असल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान, गोंदिया पोलिस, नागपूर पोलिस तसेच देशातील अनेक तपास यंत्रणा या जगदीश उईकेच्या मागावर होत्या. जगदीश उईकेने या पूर्वी देखील धमकीचे मेल पोलिसांना दिले आहे. या प्रकरणी त्याला २०२१ मध्ये अटक देखील करण्यात आली होती. यावेळी तो मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं तपासात पुढं आलं होतं. जगिदश उईके हा दिल्लीत असल्याचं. पोलिसांना कळलं होतं. त्यानुसार गोंदिया व नागपूर पोलिसांच्या तपास पथकाने त्याला दिल्लीतून अटक केली आहे.

काय आहे प्रकरण ?

आरोपी जगदीश उईके याने तपास यंत्रणणा विमानात बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती फोन आणि ईमेल करून दिली होती. या सोबतच त्याने रेल्वेमंत्री, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स व रेल्वेशी संबंधित अनेक कार्यालयांमध्ये देखील याच प्रकारे फोन व एमईयल करून रेल्वेत देखील बॉम्बस्फोट होणार असल्याची खोटी माहिती दिली होती. ईमेलमध्ये त्याने एक टेरर कोड डी कोड करण्यात आलाची खोटी माहिती देत काही दिवसांत तब्बल ३६ पेक्षा जास्त बॉम्बस्फोट होईल याची माहिती दिली होती. तपास यंत्रणांनी ही माहिती गांभीर्याने घेत विमानतळ, रेल्वेस्थानकाचा तपास सुरू होता. यामुळे अनेक विमानांचे उड्डाण उशिरा झाले. यामुळे विमान कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते.
इस्रोनं पुन्हा रचला इतिहास! देशातील पहिला ॲनालॉग स्पेस प्रकल्प सुरू; लेहमधील निर्जन ठिकाणी एकटे राहणार अंतराळवीर

पुस्तकाच्या प्रकाशनासाठी घातला घाट

जगदीश उईके हा गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव तालुक्यातील ताडगाव येथील रहिवासी आहे. २०१६ मध्ये त्याने गोंदिया सोडले. त्याने गोंदियामधील त्याचे घरही देखील विकले. तो आपल्या आई-वडिलांसोबतही राहत नसल्याने पोलिसांना त्याचा शोध घेण्यास अडचणी येत होत्या. जगदीश उईके हा लेखक असून त्याने काही वर्षांपूर्वी "आतंकवाद एक तुफानी राक्षस" नावाचे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्याने हे ईमेल केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. मात्र, पोलिसांचा त्याने दिलेल्या माहितीवर विश्वास नसून या प्रकरणी काही इतर कंगोरे आहेत का? याचा तपास पोलिस करत आहेत.

नागपूर पोलिसांचे सायबर सेल जगदीश उईकेच्या लॅपटॉप व इतर डिव्हाईसची तपासणी करत आहेत. त्यातून काही वेगळी माहिती पुढे येण्याची शक्यता आहे, अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिली.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर