Mumbai Airport Bomb Threat News In Marathi: मुंबई विमानतळावर उतरलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली. चेन्नईहून मुंबईला आलेले विमान (६ ई- ५१८८) मुंबई विमानतळावर उभे असताना ही धमकी देण्यात आली. ए ३२१ निओ एअरक्राफ्टचे पायलट मुंबई विमानतळापासून ४० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असताना हवाई वाहतूक नियंत्रणाला या धोक्याची माहिती प्राप्त झाली. या प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.
इंडिगोने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "चेन्नईहून मुंबईला आलेल्या इंडिगो फ्लाइट ६ ई ५१८८ मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले आणि विमानतळ सुरक्षा एजन्सींच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमानतळापासून दूर नेण्यात आले. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर विमान टर्मिनल परिसरात परत आणले जाईल.” चेन्नईहून आलेल्या इंडिगो विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच मुंबई विमानतळावर खळबळ माजली. विमानाची तपासणी केली जात आहे.
यापूर्वी आरबीआयसह देशातील ११ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याची देण्याची आली होती, ज्यात ७ विमानतळांचा समावेश होता. जयपुर विमानतळ प्रशासनाला या धमकीचा मेला आला होता. या मेलमध्ये दिल्ली, जयपूर, लखनौ, चंदीगड, मुंबई, चेन्नई आणि अहमदाबाद विमानतळांवर बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी प्रकरणी पोलिसांनी अधिक तपासणी केली असता सर्व माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले.
संबंधित बातम्या