Bomb Found in MSRTC Bus : नागपूरमधील गणेशपेठ बसस्टँडमध्ये MSRTC च्या एका बसमध्ये जिंवत बॉम्ब आढळल्याने खळबळ माजली आहे. बॉम्ब आढळल्याची सुचना मिळताच बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले व बॉम्ब निष्क्रिय करण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाच्या ज्या बसमध्ये बॉम्ब आढळला आहे, ती बस गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगारातून नागपूरला आली होती. बॉम्ब एका टिफिन बॉक्समध्ये ठेवण्यात आला होता.
गणेशपेठ बस स्टँडमधील ST वर्क शॉपच्या एका बसमध्ये बॉम्ब आढळल्याने शहरात खळबळ माजली आहे.
गणेशपेठ पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी एसटी डिपोतून फोन आला की, गडचिरोली आगारातून आलेल्या एका बसमध्ये एकअनोळखी डबा मिळाला आहे. ही माहिती मिळताच पोलीस व बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी टिफिन ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी सतर्कता दाखवत परिसर खाली करण्यात आला.