दाऊदी बोहरा समाजाची मोबाइल स्क्रीन-फ्री मोहीम! १५ वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दाऊदी बोहरा समाजाची मोबाइल स्क्रीन-फ्री मोहीम! १५ वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी

दाऊदी बोहरा समाजाची मोबाइल स्क्रीन-फ्री मोहीम! १५ वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी

Dec 19, 2024 03:28 PM IST

Bohras on Mobile Phone Addiction : दाऊदी बोहरा समाजाने मुलांना मोबाइलच्या व्यसणापासून दूर ठेवण्यासाठी अनोखी मोहीम सुरू केली आहे. १५ वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी घालण्यात आली आली आहे.

पंधरा वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी! मुलांना मोबाइल व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी बोहरा समाजाचा मोठा निर्णय
पंधरा वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी! मुलांना मोबाइल व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी बोहरा समाजाचा मोठा निर्णय

Bohras on Mobile Phone Addiction :  आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र लहान मुलांच्या बाबतीत मोबाईलचा अतिवापर हा चिंतेचा विषय ठरला आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांना देखील मोबाइलचे व्यसन लागलं आहे. यामुळे दाऊदी बोहरा समाजाने आपल्या मुलांना मोबाइलच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी १५  वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी घातली आहे. या सोबतच मुलांसाठी मोबाइल स्क्रीन-फ्री मोहीम सुरू करण्यात आल असून यात शाळा, समुपदेशक आणि डॉक्टर त्यांच्या मुलांच्या  मानसिक आरोग्याची काळजी घेत आहेत. 

मोबाइलच्या अतिवापरामुळे आजकालच्या मुलांवर वाईट संस्कार होत आहे. या मोबाइलचे व्यसन तरुणांना लागले आहे. लहान मुलांवर देखील मोबाइलच्या अतिवापरामुळे गंभीर परिणाम होत आहे. यामुळे सोमवारी झालेल्या समाजाच्या एका कार्यक्रमात १५ वर्षांखालीन मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.  या बाबत माझगाव येथील एमएसबी इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या शाळेत शिकणाऱ्या ८ आणि १३ वर्षांच्या दोन मुलींची आई जार यांनी माहिती देतांना सांगितले की. "मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांचे अभ्यासात  लक्ष कमी होत आहे. माझी मुले दिवसेंदिवस अधीर आणि बेफिकीर झाली होती. त्यांचा अभ्यासात देखील लक्ष लागत नव्हतं. त्यामुळे आम्ही समाजाच्या या मोहीमएत  भाग घेतला असून मुलांना मोबाइल पासून दूर ठेवण्यासाठी विविध उपाय करत आहोत. त्यांच्या मानसिक विकासाला चालना देण्यासाठी व  त्यांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी आम्ही त्यांना विविध प्रकारच्या खेळामद्धे गुंतवतो.  

स्क्रीन टाइम करण्यासाठी केल्या उपाय योजना 

जाल यांनी इतर पालकांना मोलाचा सल्ला दिला आहे. मुलांचा मोबाइल टाइम कमी करण्यासाठी  जाल यांनी त्यांचा फोन  गुगलच्या  फॅमिली लिंक अ‍ॅपशी जोडला.  याद्वारे  पालकांना मुले पाहत असलेल्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यास व काही गोष्टी पाहण्याची परवानगी डेट नाही.  दरम्यान, मुले  टेकसॅव्ही असल्याने हे  अ‍ॅप डिअ‍ॅक्टिव्हेट करायला शिकले आहेत. त्यामुळे या  उपाययोजनांचा उपयोग झाला नाही, तेव्हा तिने वेगळा मार्ग स्वीकारला.  जारने मुलांना  घराबाहेर खेळण्याचा सल्ला. यामुळे मुलांचा  स्क्रीन टाइम कमी झाला. 

मुलांच्या आरोग्यासाठी सामूहिक पुढाकार 

समाजाने सुरू केलेल्या मोहिमेत दाऊदी बोहरा समाजाच्या बंधूंचे मुंबई कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी  ब्रीच कँडी, माझगाव आणि मोहम्मद अली रोड येथील समाजाने चालविलेल्या शाळांची मदत घेतली जात आहे आहे. समाजातील विविध ट्रस्ट आणि विभागही या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

सामुहिक कृतीची गरज लक्षात घेऊन मोबाइल पासून मुलांना परावृत करण्यासाठी  चर्चासत्रेही कम्युनिटी सेंटर्समध्ये आयोजित केली जात आहेत. १५ वर्षांखालील मुलांमध्ये निरोगी जीवनशैलीच्या सवयी विकसित केल्या जात आहे. यासाठी  डॉक्टर आणि तज्ञांच्या मदतीने विशेष उपक्रम राबवले जात आहे. यात  खेळ, पुस्तके, निसर्गाशी नाळ जोडून पालकांनाही घरातील   व्यस्तता व  उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जात आहे.  

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर