Pune Yerwada crime news : पुण्यातील येरवडा येथे खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील न्याती बिल्डिंग समोरील झाडाझुडपात बेवारस अर्धवट मृतदेह आढळला आहे. धक्कादायक म्हणजे हा मृतदेहाचे लचके भटक्या कुत्र्यांनी तोडले असून मृतदेहाच्या कमरेखालचा काही भाग उरला आहे. या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षादेण्यात आल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. हा मृतदेह नेमका कुणाचा आहे याची ओळख अद्याप पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येरवडा पोलिस नियंत्रण कक्षाला गुरुवारी (दि ७) सकाळी ९ च्या सुमारास मृतदेह मिळाल्याची माहिती मिळाली. येरवडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. संबंधित व्यक्तिचा मृत्यू हा आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना धक्का बसला. कुत्र्यांनी मृतदेहाचा वरचा व कमरेखालचा भाग खाल्ला होता. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. कुत्र्यांनी या मृतदेहाचा कवटी व वरील भाग पूर्णपणे खाल्लेला तर कमरेपासून खालील भाग थोडा शिल्लक आहे. हा मृतदेह बेवारस व्यक्तीचा शक्यता आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. या भागाच अनेक बेवारस लोक, बेघर लोक झोपतात, आश्रय घेतात. त्यांच्यापैकी कोणाचा हा मृतदेह असावा, अशी प्राथमिक शक्यता आहे.
नो पार्किंगमध्ये लावलेल्या कारच्या चाकाला लावलेले जॅमर काढण्यासाठी एक हजारांची लाच मागणार्या वाहतूक शाखेतील वॉर्डनसह सहायक फौजदाराविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस फौजदार किरण दत्तात्रय रोटे (वय ५१), ट्रॅफिक वॉर्डन अनिस कासम आगा (वय ४८, रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका व्यक्तीने फिर्याद दिली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. समर्थ वाहतूक विभागांतर्गत येणार्या एका रस्त्यावरील नो पार्किंगमध्ये तक्रारदाराने त्यांची मोटार लावली होती. त्यामुळे वाहतूक विभागाने त्यांच्या मोटारीला जॅमर लावला. जॅमर काढण्यासाठी समर्थ वाहतूक विभागातील ट्रफिक वॉर्डन अनिस आगा याने तक्रारदाराकडे १ हजार रुपयांची लाच मागितली. दरम्यान, एसीबीने त्यांना सापळा रचून पकडले.