मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईकरांपेक्षा प्राण्यांचे जीवन चांगले, पेंग्विनवर कोट्यवधींचा खर्च, RTIमधून माहिती समोर

मुंबईकरांपेक्षा प्राण्यांचे जीवन चांगले, पेंग्विनवर कोट्यवधींचा खर्च, RTIमधून माहिती समोर

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 23, 2022 12:52 PM IST

Penguins In Rani Bag: पेंग्विन हा बर्फाच्छादित प्रदेशातील पक्षी असल्यानं तो मुंबईच्या दमट वातावरणात फार काळ जगणार नाही असा दावा तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.

मुंबईत राणीच्या बागेतील पेंग्विन
मुंबईत राणीच्या बागेतील पेंग्विन (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Penguins In Rani Bag: मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ते आणल्यानंतर मुंबईतील राणीच्या बागेतही चित्ते आणण्याची तयारी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, राणीची बाग म्हणजेच वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात असणाऱ्या प्राण्यांवरील खर्चाची माहिती आता समोर आली आहे. राणीच्या बागेत पेंग्विन आणल्यानतंर त्यावरून राजकीय वातावरण बरंच तापलं होतं. आता पेंग्विनवर करण्यात येणाऱ्या खर्चाबाबत माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती मिळवली आहे. यात गेल्या चार वर्षांमध्ये पेंग्विनच्या देखभालीसाठी १९.११ कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय प्राणीसंग्रहालयात असणाऱ्या उद्यानासाठी ९.५२ कोटी रुपये खर्च केले असल्याचं उघड झालं आहे.

मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने गेल्या चार वर्षात २६४.६५ कोटी रुपये खर्च केले आहेत. यापैकी भायखळा प्राणीसंग्रहालयात नुतनीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ९५ कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात ६२.९१ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. पहिल्या टप्प्यातील कामांमध्ये एन्ट्री प्लाझा, अंतर्गत पॉकेट गार्डन, सार्वजनिक सुविधा, सीसीटीव्ही, पेंग्विन प्रदर्शन, प्राणीसंग्रहालय इत्यादीचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये वाघ, सिंह सांबर इत्यांदींसह पक्ष्यांचे आणखी एक जाळे यांचा समावेश आहे. यावर ५७.११ कोटी रुपये खर्च केले आहेत.

राणीच्या बागेत पेंग्विन आणल्यानंतर त्यावरून बरचं रणकंदन झालं होतं. पेंग्विन हा बर्फाच्छादित प्रदेशातील पक्षी असल्यानं तो मुंबईच्या दमट वातावरणात फार काळ जगणार नाही असा दावा तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र राणीच्या बागेत अंटार्टिका खंडातील वातावरणासारखीच सुविधा तयार करण्यात आली आहे. पेंग्विनची दोन पिल्लेसुद्धा जन्माला आली आहेत. पेंग्विन कृत्रिम वातावरणात जगू शकेल की नाही याबाबत तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली होती. तसंच मुंबईत असणाऱ्या दमट वातावरणाचा आणि प्रदूषणाचा परिणामही पेंग्विनवर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मिळवणाऱ्या जितेंद्र घाडगे यांनी काही आरोपही केले आहेत. उद्यान विभागाकडून करण्यात येणारा खर्च हा पैशांची उधळपट्टी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच मुंबईकरांपेक्षा प्राणी जास्त चांगलं जीवन जगत आहेत. प्राण्यांच्या घरांची किंमत पाच ते ९ कोटी रुपये आहे. हा सर्व खर्च मुंबईकरांनी भरलेल्या करातून केला जात असल्याचंही ते म्हणाले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या