मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMC: मुंबईत २२६ इमारती अतिधोकादायक; रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे आवाहन
Mumbai Unsafe Buildings
Mumbai Unsafe Buildings

BMC: मुंबईत २२६ इमारती अतिधोकादायक; रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे आवाहन

26 May 2023, 19:48 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Mumbai Unsafe Buildings: मुंबई महानगरपालिकेने शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे.

Brihanmumbai Municipal Corporation: मुंबई महानगर पालिकेने शहरातील अतिधोकादायक २२६ इमारतींची यादी जाहीर केली आहे. या यादीत मुंबई शहर विभागात ३५, पूर्व उपनगरे विभागात ६५ तर पश्चिम उपनगरे विभागातील १२६ इमारतींचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळ या इमारतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंह यांनी आवाहन केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना महानगरपालिकेकडून वारंवार सुचना दिल्या गेल्या आहेत. महापालिकेकडून सुचना देण्यात आल्यानंतरही अनेक इमारतीत नागरिक वास्तव्यास आहेत. धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागिरकांनी पावसाळ्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. संबंधित इमारत कोसळून कोणतीही दुर्घटना घडल्यास किंवा जीवितहानी झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी इमारतीमध्ये राहत असलेल्या नागरिकांची असेल, असाही इशारा मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना दिला आहे.

Monsoon Update: जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार, हवामान विभागाचा दुसरा अंदाज

कोणत्या इमारती धोकादायक ठरतात?

१) इमारतीचे कॉलम झुकल्यासारखे दिसून आल्यास, इमारतीचा बीम झुकल्यासारखे दिसून आल्यास, इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखे दिसून आल्यास.

२) इमारतीच्या तळ मजल्याचा भाग खचल्यासारखा दिसून आल्यास.

३) इमारतीच्या कॉलममधील भेगा वाढत असल्याचे दिसून आल्यास.

४) इमारतीच्या कॉलममधील काँक्रिट पडत असल्याचे दिसून आल्यास.

५) इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखा दिसल्यास.

६) इमारतीच्या आर. सी. सी. चेंबर्स (कॉलम, बीम्स) व विटांची भिंत यातील सांधा / भेगा वाढत असल्यास.

७) स्लॅबचे किंवा बीमचे तळ मजल्याचे काँक्रिट पडत असल्यास.

८) इमारतीच्या गिलाव्यामध्ये (प्लास्टर) मोठ्या प्रमाणात भेगा वाढत असल्यास.

९) इमारतीच्या काही भागात विशिष्ट आवाज होत असल्यास.

१०) इमारतीच्या स्लॅब, बीम, कॉलमच्या भेगांमुळे लोखंडी शिगांचा आकार गंजल्यामुळे कमी झालेला असल्यास.

विभाग