मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 18, 2024 11:10 AM IST

BMC finds 17000 Mumbaikars with high BP : मुंबई महानगर पालिकेतर्फे काही नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात १७ हजार मुंबईकरांना उच्चरक्तदाब असल्याचे आढळले आहे.

मुंबई महानगर पालिकेतर्फे काही नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात १७ हजार मुंबईकरांना उच्चरक्तदाब असल्याचे आढळले आहे.
मुंबई महानगर पालिकेतर्फे काही नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात १७ हजार मुंबईकरांना उच्चरक्तदाब असल्याचे आढळले आहे.

BMC finds 17000 Mumbaikars with high BP : जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त मुंबई महानगर पालिकेतर्फे १८ लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनेक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तब्बल १७ हजार मुंबईकरांना उच्च रक्तदाब तर ६० ते ७० हजार मुंबईकर मधुमेहाने ग्रस्त असल्याचे पुढे आले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या दवाखान्यासह खासगी दवाखान्यात हे नागरिक उपचार घेत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

आज जागतिक उच्च रक्तदाब दिवस आहे. या दिनानिमित्त, मुंबई महानगर पाकिकेने मुंबईकरांना आवाहन करत त्यांना नियमितपणे रक्तदाब मोजण्याचे आणि नागरी संस्थेद्वारे प्रदान केलेल्या मोफत उपचार सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. जागतिक स्तरावर, उच्च रक्तदाब असलेल्या अंदाजे ४६ टक्के लोकांना त्यांच्या आरोग्यबद्दल माहिती नसल्याचे देखील या पाहणीत पुढे आले आहे. या पाहणीत शहरातील नागरिकांची आरोग्य स्थिती दर्शवते.

Fact Chack: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

१० हजार नागरिकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबईत, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे एकूण मृत्यूंपैकी जवळपास २५ टक्के रुग्णांचे मृत्यू होतात. गेल्या १० वर्षात हा मृत्युदंर स्थिर आहे. २०२२ मध्ये, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे झालेल्या १७ हजार मृत्यूंपैकी सुमारे १० हजार नागरिकांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला. तर उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या घटनांसाठी सर्वात मोठे जोखीम घटक आहेत. मुंबईतील प्रौढ लोकसंख्येमध्ये उच्च रक्तदाबाचा प्रादुर्भाव २६ टक्के इतका असल्याचा अंदाज आहे.

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ दक्षा शाह यांनी सांगितले की, या वर्षीच्या उच्च रक्तदाब दिनाची थीम आहे, 'तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा, ​​त्यावर नियंत्रण ठेवा, दीर्घकाळ जगा. ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये जोखीम घटक असल्यास दर सहा महिन्यांनी किंवा त्यापूर्वी नियमित तपासणी केली पाहिजे,”

या संबंधी गोळा करण्यात आलेली माहिती दर्शवते की उच्च रक्तदाब असलेल्या प्रौढांपैकी निम्म्याहून कमी लोकांचे जगभरात निदान आणि उपचार केले जातात. आणि ५ पैकी फक्त एका प्रौढ व्यक्तीचा रक्तदाब नियंत्रणात असतो. यामुळे ८० टक्के लोकांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, अनियमित हृदयाचे ठोके आणि मूत्रपिंडाचे विकार असे अनेक त्रास होण्याची शक्यता असते. हे त्रास जिवावर देखील बेतू शकतात.

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ऑगस्ट २०२२ पासून मुंबई महानगर पालिकेच्या २६ रुग्णालयांमध्ये असंसर्गजन्य रोग (NCD) विभाग स्थापन केला आहे. या विभागाने एकत्रितपणे ३.५ लाख लोकांची मधुमेह आणि उच्च रक्तदाबासाठी तपासणी केली आहे. तपासणी केलेल्यांपैकी, सुमारे १० टक्के लोकांना उच्च रक्तदाब असल्याचे निष्पन्न झाले. तर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.

६०,००० ते ७०,००० नागरिक मधुमेहाने ग्रस्त

जानेवारी २०२३ पासून, बीएमसीने झोपडपट्ट्या आणि इतर भागातील ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची तपासणीकरण शहरव्यापी सर्वेक्षण केले आहे. ज्यात १८ लाखांहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी सुमारे १७ हजार लोकांना उच्च रक्तदाब असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय, बाळासाहेब ठाकरे क्लिनिकमध्ये सुमारे ६०,००० ते ७०,००० लोकांची मधुमेह आणि रक्तदाबाची नियमित तपासणी केली जाते.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग