BMC Recruitment 2024 : मुंबई महानगर पालिकेत होणार मेगा भरती! तब्बल १ हजार ८४६ भरणार! असा करा अर्ज-bmc executive assistant recruitment for 1846 post check important dates and details ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMC Recruitment 2024 : मुंबई महानगर पालिकेत होणार मेगा भरती! तब्बल १ हजार ८४६ भरणार! असा करा अर्ज

BMC Recruitment 2024 : मुंबई महानगर पालिकेत होणार मेगा भरती! तब्बल १ हजार ८४६ भरणार! असा करा अर्ज

Aug 20, 2024 08:17 AM IST

BMC Executive Assistant Recruitment : मुंबई महानगर पालिकेत मेगा भरती होणार आहे. पालिकेच्या कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी ही भरती होणार असून तब्बल १ हजार ८४६ पदे भरली जाणार आहेत.

BMC Executive Assistant Recruitment
BMC Executive Assistant Recruitment

BMC Executive Assistant Recruitment : मुंबई महानगर पालिकेत लवकरच मेगा भरती होणार आहे. पालिकेच्या ‘कार्यकारी सहायक’ म्हणजेच लिपिक या संवर्गातील १ हजार ८४६ जागा या भरल्या जाणार आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया सरळसेवेने राबवली जाणार आहे. या जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनया आज २० ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ९ सप्टेंबर रात्री १२ पर्यन्त अर्ज करता येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या सरळ सेवा लिपिक पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले जात आहे. आज पासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुकांना मुंबई महानगर पालिकेच्या https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या संकेतस्थळावर या भरतीबाबत माहिती देण्यात आली आहे.

८१००० मिळणार पगार

मुंबई पालिकेच्या विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील २५५०० ते ८११०० (पे मॅट्रिक्स-एम १५) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) ही १८४६ रिक्त पदे भरली जाणार आहे. यात अनुसूचित जाती साठी १४२, अनुसूचित जमातीसाठी १५०, विमुक्त जाती-अ साठी ४९, भटक्या जमाती-ब साठी ५४ , भटक्या जमाती-क साठी ३९. भटक्या जमाती-ड साठी ३८, विशेष मागास प्रवर्ग साठी ४६, इतर मागासवर्गसाठी ४५२, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकास्थी १८५, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गसाठी १८५ तर खुला प्रवर्गसाठी ५०६ जागा रिक्त आहेत. या बाबतची जाहिरात पालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

आस करा अर्ज ?

महानगर पालिकेच्या https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या वेबसाइटवर या भारतीची जाहिरात देण्यात आली आहे. या जाहिरातीत अटी व शर्तीं देखील देण्यात आल्या आहेत. या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्जाची लिंक (यूआरएल) देण्यात आली आहे. इच्छुकांनी या वर अर्ज भरावा.

सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा

जाहिरातीत दिलेल्या सर्व मार्गदर्शक सुचना काळजीपूर्वक वाचा. त्यांचे काटेकोरपणे पालन करुन विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज विहित मुदतीत सादर करा. भरलेल्या संपूर्ण अर्जाची प्रिंट काढून स्वत:जवळ ठेवा. उमेदवारांच्या मार्गदशर्नासाठी ९५१३२५३२३३ हा मदतसेवा क्रमांक जारी करण्यात आला आहे. यावर इच्छुकांना माहिती घेता येणार आहे.

विभाग