मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bmc Election 2022 : बदल सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा'; शिवसेनेची नवी टॅगलाईन

Bmc Election 2022 : बदल सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा'; शिवसेनेची नवी टॅगलाईन

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 21, 2022 06:50 PM IST

मुंबई महापालिका निवडणुकांसाठी(Bmc election 2022) 'बदल सोडाच,गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा',असा शिवसेनेचा नवा नारा असणार आहे.

शिवसेनेची नवी टॅगलाईन
शिवसेनेची नवी टॅगलाईन

मुंबई–आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (Bmc election 2022) सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असली तरी शिवसेना व भाजपमध्येच थेट लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपने कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, आपली शेवटची निवडणूक असल्याप्रमाणे झपाटून कामाला लागा. दुसरीकडे शिवसेनेनेहीआपली सत्ता कायम ठेवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी 'बदल सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा', असा शिवसेनेचा नवा नारा असणार आहे.

शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या आयोजित मेळाव्यासाठी आज नेस्को मैदानात भव्य तयारी करण्यात आली आहे. यासाठी मोठया प्रमाणतफलक लावण्यात आले.यावेळी एक फ्लेक्सची प्रचंड चर्चा सभास्थळी पाहायला मिळाली. शिवसेनेने या आधी देखील टॅग लाईनच्या माध्यमातून विरोधकांना जेरीस आणले होते. याआधी ४० बंडखोर आमदारांना पन्नास खोके एकदम ओक्के,गद्दारांना माफी नाही, पन्नास खोके माजलेत बोके अशा आशयाच्या घोषणा आणि फ्लेक्स पाहियला मिळाले होते.

मागील महापालिका निवडणुकीत'करून दाखवलं'ही टॅग लाईन तर आता आगामी पालिका निवडणुकीत'बदल सोडाच गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा'ही टॅगलाईन घेऊन सेना निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

मुंबई जिंकण्यासाठी मोदींच्या‘या’ मंत्राचा वापर -

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या वादाआधी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार,याबाबत उत्सुकता आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बूथ जिंका मुंबई जिंका,असा नवीन मंत्र उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना देणार आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीआधी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना आवाहन करणार आहेत. शिंदे गट आणि भाजपविरोधात उद्धव ठाकरेंनी आक्रमक रणनीती आखली आहे. बूथ जिंका निवडणूक जिंका, असा कानमंत्र उद्धव ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.

भाजपनेही २०१४ पासून सर्व निवडणुकांमध्ये पन्ना प्रमुख आणि बूथ प्रमुख नेमून या प्रमुखांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. भाजपच्या या रणनितीचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणावर झाला. उद्धव ठाकरे यांनीही अशाचप्रकारे बूथ जिंका,निवडणूक जिंका,अशी रणनीती अवलंबली आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या