मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMC: मुंबईतील नगरसेवक संख्या 'जैसे थे' राहणार; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

BMC: मुंबईतील नगरसेवक संख्या 'जैसे थे' राहणार; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 03, 2022 06:37 PM IST

BMC Corporators: मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच शिंदे-फडणवीस सरकारनं मुंबईच्या वॉर्ड संख्येबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

BMC
BMC

Mumbai Municipal Wards: मुंबईसह राज्यातील अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत वाढ करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय शिंदे सरकारनं फिरवला आहे. महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. या निर्णयामुळं मुंबई महापालिकेची सदस्य संख्या २३६ वरून पुन्हा २२७ वर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील नगरसेवकांची सध्याची संख्या २२७ इतकी आहे. ही संख्या २००१च्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात आली आहे. तेव्हापासून २०११ पर्यंत लोकसंख्येत ३.८७ टक्के इतकी वाढ झाली होती. मात्र, लोकप्रतिनिधींच्या संख्येत वाढ झाली नव्हती. हे लक्षात घेऊन वाढीव प्रतिनिधीत्व देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला होता. मात्र, आता शिंदे सरकारनं पुन्हा या निर्णयात बदल केला आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेची सदस्य संख्या पुन्हा ९ ने कमी होणार आहे. तसंच, इतर महापालिकांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्येत बदल होणार आहेत.

अशी ठरेल नवी सदस्यसंख्या

  • ३ लाखांपेक्षा अधिक व ६ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांची किमान संख्या ६५ इतकी तर कमाल संख्या ८५ इतकी असेल.
  • ३ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक पालिकेत १५ हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.
  • ६ लाखांपेक्षा अधिक व १२ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ८५ इतकी तर कमाल संख्या ११५ इतकी असेल.
  • ६ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक २० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.
  • १२ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ४० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.
  • २४ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ५० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.
  • ३० लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १ लाख लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.
  • १२ लाखांपेक्षा अधिक व २४ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ११५ इतकी तर कमाल संख्या १५१ इतकी असेल.
  • २४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १५१ इतकी तर कमाल संख्या १६१ इतकी असेल.
  • ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १६१ इतकी तर कमाल संख्या १७५ इतकी असेल.

IPL_Entry_Point

विभाग