मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Masks Compulsory : राज्यात पुन्हा मास्कसक्ती, मुंबई मनपाच्या सर्व रुग्णालयात मास्क घालणं बंधनकारक

Masks Compulsory : राज्यात पुन्हा मास्कसक्ती, मुंबई मनपाच्या सर्व रुग्णालयात मास्क घालणं बंधनकारक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 10, 2023 04:58 PM IST

Masks Compulsory In Mumbai : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळं आता बीएमसीच्या रुग्णालयांमध्ये मास्कसक्ती करण्यात आली आहे.

Masks Compulsory In Mumbai :
Masks Compulsory In Mumbai : (HT)

Masks Compulsory In Mumbai : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. याबाबत केंद्रिय आरोग्यमंत्रालयानं नियमावली जारी केल्यानंतर आता मुंबई महापालिकेतील सर्व रुग्णालयांमध्ये मास्कसक्ती करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई मनपातील सर्व कर्मचाऱ्यांना मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळं आता गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील नागरिकांना मास्कपासून सुटका मिळालेली असतानाच आता मास्क पुन्हा परतला आहे. त्यामुळं आता वाढती रुग्णसंख्या पाहता पुढील काही दिवसांत मुंबईसह इतर शहरांमध्येही मास्कसक्ती करण्यात येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मुंबईत कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळं त्यावर उपाययोजना करण्यासाठी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सर्व विभागांची एक बैठक आयोजित केली होती. त्यात मनपाच्या रुग्णालयांमध्ये मास्कची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळं महापालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये देखील कर्मचाऱ्यांना मास्क घालण्याच्या सूचना आयुक्तांकडून करण्यात आल्या आहेत. मुंबईतील ६५ वर्षांवरील नागरिकांना देखील मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

केंद्रातील मोदी सरकारनं दिलेल्या सूचनेनंतर मुंबईसह देशभरातील अनेक शहरांमध्ये कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मॉकड्रिल केलं जाणार आहे. शासकीय रुग्णालयांसहित खाजगी रुग्णालयांमधील सुविधांचा प्रशासनाकडून आढावा घेण्यात येणार आहे. रुग्णालयांमध्ये आयसीयू, बेड्स, ऑक्सिजन सिलिंडर्स आणि औषधांची उपलब्धता आहे की नाही?, याची तपासणी प्रशासनाकडून केली जाणार आहे.

WhatsApp channel