मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

May 17, 2024 07:27 PM IST

पुनर्बांधणीच्या कामासाठी

मुंबईतील करी रोड, माटुंगा आणि महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा आणि महालक्ष्मी या तीन उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणीच्या प्रस्तावांना बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) आणि रेल्वे यांच्यात बुधवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांसाठी महापालिका अर्थसाहाय्य करणार असून महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (Maharashtra Rail Infrastructure Development Corporation Limited) हे काम हाती घेणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत प्रस्तावित प्रकल्प आणि पुनर्बांधणीसुरू असलेल्या पुलांसह शहरातील इतर अनेक पुलांच्या स्थितीवर चर्चा झाली. शहरात सुरू असलेल्या पुलांचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, वाहतूक कोंडी कमी व्हावी, नागरी सेवांमध्ये वाढ व्हावी यासाठी शहरातील पुलांचे प्रकल्प जलद गतीने करण्याची गरज आहे, असे मत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केले.

या बैठकीनंतर महापालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, रे रोड, भायखळा, दादर आणि घाटकोपर येथील पुलांच्या पुनर्बांधणीचा प्राथमिक टप्प्याची चाचणी सुरू आहे. शहरातील माझगाव येथील ओलिवंत पूल, आर्थर ब्रिज आणि भायखळा येथील एस ब्रिज या तीन पुलांची पुनर्बांधणी पुढे ढकलण्यात आली आहे. कारण हे पूल सध्या सुस्थितीत असून तातडीने पुनर्बांधणीची गरज नसल्याचे मध्य रेल्वेने २४ एप्रिल रोजी महापालिकेला कळवले होते. १० ते १५ वर्षांनंतर पुलांच्या पुनर्बांधणीच्या गरजेचा रेल्वे पुनर्विचार करेल, अशी माहिती महापालिकेला देण्यात आली.

सायन रोड ओव्हरब्रिज पाडण्याची तारीख पुन्हा पुढे ढकलली

सायन येथील वसाहतकालीन रोड ओव्हरब्रिज बंद करण्याची तारीख तीन महिन्यांत तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली.आता लोकसभा निवडणुकीनंतरच हा पूल पाडून त्याची पुनर्बांधणी केली जाण्याची शक्यता आहे. धारावी, लालबहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडणारा आरओबी हा महत्त्वाचा दुवा आहे. तो बंद केल्याने पूर्व-पश्चिम वाहतूक विस्कळीत होईल आणि कुर्ल्यामार्गे वाहनचालकांचे स्थलांतर करावे लागणार आहे. आरओबी पाडणे आणि पुनर्बांधणी साठी अनुक्रमे तीन महिने आणि दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे. हा पूलाच्या पुनर्बांधणीसाठी एकूण खर्च ५० कोटी रुपये आहे. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग टाकण्यात येणार असून मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या वेगळे करण्यात मदत होणार आहे. अतिरिक्त मार्गांना सामावून घेण्यासाठी आरओबीमधील गर्डरची लांबी सध्याच्या ३० मीटरवरून ४९ मीटर पर्यंत वाढविण्याची आवश्यकता आहे.

|#+|

तीन महिन्यात तिसऱ्यांदा तारिखेत बदल

आरओबी बंद करण्याची सुरुवातीची तारीख २० जानेवारी होती, परंतु रहिवाशांचा विरोध आणि खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्तक्षेपामुळे ती पुढे ढकलण्यात आली. २८ फेब्रुवारी ही नवी तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संपणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार असल्याने तीही पुढे ढकलण्यात आली. हा पूल बंद करण्याची तिसरी तारीख २८ मार्च होती. मात्र, यंदा बृहन्मुंबई महानगरपालिका, रेल्वे आणि वाहतूक पोलिसांना २७ मार्च रोजी पुन्हा या कामाला स्थगिती देण्यात आली.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग