BMC लिपीक पदासाठीची 'ती' शैक्षणिक अट रद्द; १,८४६ जागांसाठी सरळ सेवा भरती नव्याने राबवणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMC लिपीक पदासाठीची 'ती' शैक्षणिक अट रद्द; १,८४६ जागांसाठी सरळ सेवा भरती नव्याने राबवणार

BMC लिपीक पदासाठीची 'ती' शैक्षणिक अट रद्द; १,८४६ जागांसाठी सरळ सेवा भरती नव्याने राबवणार

Published Sep 10, 2024 11:07 PM IST

BMC clerk postrecruitment : मुंबई महापालिकेने क्लर्क भरतीसाठी ‘माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) आणि पदवी परीक्षेत ‘प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण’ही शैक्षणिक अट लागू करण्यात आली होती. ही एक अट आता महानगरपालिका प्रशासनाने रद्द केली आहे.

BMC लिपीक पदासाठीची 'ती' शैक्षणिक अट रद्द
BMC लिपीक पदासाठीची 'ती' शैक्षणिक अट रद्द

मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया (Recruitment for the post of Clerk) राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी ‘माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) आणि पदवी परीक्षेत ‘प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण’ ही शैक्षणिक अट लागू करण्यात आली होती. ही एक अट आता महानगरपालिका प्रशासनाने रद्द केली आहे. त्यामुळे आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या १५ दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेत लिपीक पदाच्या १८४६ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होती. या जागांसाठी राज्यभरातून तरुण-तरुणींनी अर्ज सादर केले होते. मात्र बीएमसीने पहिल्या प्रयत्नात दहावी पास होण्याची अट घातल्याने हजारो उमेदवारांना अर्ज भरता आला नव्हता. महापालिकेच्या या जाचक अटी विरुद्ध राज्यभरातून तीव्र संताप करण्यात आला. अनेक राजकीय नेत्यांनीही या मुद्द्यावरून प्रशासनावर टीका केली होती. आता अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर महापालिकेने परिपत्रक जारी करत उमेदवारांना गुड न्यूज दिली आहे. लिपीक पदाच्या या भरतीसाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील'प्रथम प्रयत्नात'ही अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, राज्यभरातील लाखो बेरोजगार तरुण-तरुणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी २० ऑगस्ट २०२४ पासून भरती प्रक्रिया राबवली होती. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले होते. या भरतीसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही शैक्षणिक अट लागू होती. हा जाचक अट रद्द करण्याची मागणी अनेक स्तरातून होत होती. याचा विचार करत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महापालिकेत कार्यकारी सहाय्यक संवर्गातील १हजार ८४६जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या जागांसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून २०ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यास प्रारंभ करण्यात आला होता. तर ९सप्टेंबर २०२४ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती. आता मुदत संपल्यानंतर प्रशासनाने परिपत्रक काढत ती शैक्षणिक अट रद्द केली आहे.

 

यासाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली जात असून येत्या १५ दिवसात पुन्हा भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. आधी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. पहिल्या प्रयत्नाच उत्तीर्ण या अटीमुळे जे उमेदवार अर्ज करू शकले नव्हते, त्यांच्यासाठी ही संधी देण्यात आली आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर