मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMC Budget : बीएमसी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या मुंबई बाहेरच्या रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क घेण्याचा विचार, भाजपचा विरोध

BMC Budget : बीएमसी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या मुंबई बाहेरच्या रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क घेण्याचा विचार, भाजपचा विरोध

Feb 02, 2024 06:25 PM IST

Reaction on BMC Budget : मुंबईच्या बाहेरील रुग्णांकडून बीएमसीच्या रुग्णालयांत अतिरिक्त शुल्क आकारण्याच्या प्रस्तावाला राजकीय पक्षांनी कडाडून विरोध दर्शवला आहे.

BMC Budget 2024-25
BMC Budget 2024-25

Mumbai Mahapalika ArthSankalp : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मुंबईबाहेरील रुग्णांनी सेवा घेतल्यास त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारण्याचे संकेत मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातून (BMC Budget) देण्यात आले आहेत. यास तीव्र विरोध होत आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी लगेचच आपली नाराजी नोंदवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबई शहरात व उपनगरात मुंबई महापालिकेची अनेक रुग्णालयं आहेत. या रुग्णालयांमध्ये आरोग्याच्या उत्तम सुविधा पुरवल्या जातात. अनेक मोठ्या व किचकट शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळं केवळ मुंबई शहरच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील व राज्यभरातील अनेक रुग्ण इथं उपचार घेण्यासाठी येत असतात. त्यामुळं या रुग्णालयांमध्ये कायम मोठी गर्दी असते.

Raj Thackeray : जरांगेंच्या आंदोलनामुळं मराठा समाजाला नेमकं काय मिळालं?; राज ठाकरेंचा सवाल

ही सर्व रुग्णालये मुंबईकरांच्या करातून चालत असतात. त्यामुळं बाहेरच्या रुग्णांसाठी इथं स्वतंत्र शुल्क लागू करण्याची गरज आहे. त्या दृष्टीनं महापालिका चाचपणी करेल, असं सुतोवाच मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आलं आहे.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी यास तीव्र विरोध दर्शवला आहे. ही बाब आक्षेपार्ह व अन्यायकारक आहे. भाजपचा याला विरोध राहील, असं त्यांनी म्हटलं आहे.

मुंबईतील प्रकल्पांसाठी सर्वसामान्यांवर कर?

मुंबई महापालिकेनं कोस्टल रोड, जीएमएलआर, एसटीपी असे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत. हे प्रकल्प विनाअडथळा सुरू राहावेत. यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. हा निधी कसा उभा करता येईल यासाठी सल्लागार नेमण्याचं सुतोवाच महापालिकेनं अर्थसंकल्पात केलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

Thane Sex Racket: ठाण्यात रिसॉर्टच्या नावाखाली सेक्स रॅकेट, एका महिलेला अटक; ३ तरुणींची सुटका

मुंबई महापालिकेच्या हजारो कोट्यवधींच्या ठेवीतून आम्ही मुंबईकरांसाठी नवनवे प्रकल्प सुरू करण्याचं नियोजन केलं होतं. त्यासाठी कोणतेही छुपे कर आणि कोणतेही टोल आम्ही लादले नाहीत. दुर्दैवानं, भाजप पुरस्कृत खोके सरकारनं मुंबई लुटली. त्यांचे खास बिल्डर आणि कंत्राटदारांना मदत केली आणि आता सर्वसामान्य नागरिकांवर कर आणि टोल लावण्याचा यांचा विचार आहे, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमधून केली आहे.

आशिष शेलारांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका

मुंबई महापालिकेच्या आजच्या अर्थसंकल्पाचं त्यांनी कौतुक केलं आहे. मात्र, आणखी काही बाबी असायला हव्या होत्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या २५ वर्षांत पेंग्विन सुरू केलेल्या चमकोगिरीच्या अजेंड्यातून महापालिका बाहेर पडतेय हे आशादायी चित्र आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग