BMC Announces Water Cut In Mumbai: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईत दोन दिवस पाणी कपात करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागातील वेरावली जलाशय-२ येथे ७५० मिलीमीटर व्यासाच्या चार वॉल्व्ह बदलण्यात येणार आहे. यामुळे येत्या गुरुवारी (दि १९) रात्री ८ पासून ते दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि २०) दुपारी २ पर्यंत मुंबईतीली के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी या काळात पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांना पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा तसेच पाणी जपून वापरावे. कम पूर्ण झाल्यावर नियमित वेळेनुसार पाणी सोडण्यात येणार आहे. पाणी आल्यावर काही दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे असे देखील पालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी दुपारी २ पर्यंत हे काम केले जाणार आहे.
के पूर्व - महाकाली मार्ग, पूनम नगर, गोनी नगर, तक्षशिला मार्ग, एमएमआरडीए वसाहत, दुर्गा नगर, पेपर बॉक्स, मालपा डोंगरी क्रमांक ३, शेर ए पंजाब, बिंद्रा संकूल, हंजर नगर, गणेश नगर, शोभना परिसर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.३० ते सकाळी ७.५० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.
के पूर्व - सुंदर नगर, गौतम नगर, मॉडर्न बेकरी, प्रजापूरपाडा (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - पहाटे ५.०० ते सकाळी ८.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.
के पूर्व - त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, अचानक कॉलनी, कलेक्टर कंपाऊंड, सारीपूत नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी ८.०० ते सकाळी १०.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.
के पूर्व – दुर्गानगर, मातोश्री क्लब (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.
के पश्चिम- सी.डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी मार्केट, भर्डावाडी, नवरंग सिनेमाच्या मागे, अंधेरी गावठाण, आंब्रे गार्डन पंप व गझदर पंप, गिल्बर्ट हिलचा काही भाग, तीन नळ, गावदेवी डोंगरी मार्ग, उस्मानिया डेअरीचा काही भाग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी ७.३० ते दुपारी १२.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.