Gadchiroli: गर्भवती महिलेला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरनं रक्त पोहोचवलं; मुसळधार पावसामुळं रस्ते झाले होते बंद-blood transported by helicopter to save pregnant woman in gadchirolis bhamragarh ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gadchiroli: गर्भवती महिलेला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरनं रक्त पोहोचवलं; मुसळधार पावसामुळं रस्ते झाले होते बंद

Gadchiroli: गर्भवती महिलेला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरनं रक्त पोहोचवलं; मुसळधार पावसामुळं रस्ते झाले होते बंद

Sep 12, 2024 08:32 AM IST

Gadchiroli pregnant woman News: हेलिकॉप्टरद्वारे महिलेपर्यंत रक्त पोहोचवणारे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.

गर्भवती महिलेला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरनं रक्त पोहोचवलं
गर्भवती महिलेला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरनं रक्त पोहोचवलं

Gadchiroli News: गडचिरोलीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यात कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.नदी-नाल्यांना पूर अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून शेजारच्या गावांशी संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत गर्भवती महिलेची प्रकृती चिंताजनक होती आणि तिला रक्ताची गरज होती. परंतु, रस्ता पाण्याखाली गेल्याने हे शक्यत नव्हते. मात्र, त्यानंतर महिलेचे वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे रक्त पोहोचवण्यात आले.

हे प्रकरण गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील आहे. गडचिरोली सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान वेद्यकीय पथकाने एका महिलेची प्रसूती केली. परंतु, एक युनिट रक्त चढवण्याल्यानंतर या महिलेला आणखी एका पिशवी गरज होती. परंतु, या भागात पुरस्थिती निर्माण झाल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. यामुळे महिलेसाठी आणखी एका रक्ताच्या पिशवीची सोय करणे, एखाद्या आव्हानासारखे होते. मात्र, महिलेची प्रकृती बिघडत असल्याने हेलिकॉप्टरद्वारे तिच्यापर्यंत रक्त पोहोचवण्यात आले.

हेलिकॉप्टरद्वारे महिलेपर्यंत रक्त पोहोचवले

मिळालेल्या माहितीनुसर, मंतोशी गजेंद्र चौधरी या महिलेला भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांची प्रसूती केली. मात्र, त्यानंतर तिला रक्ताची गरज होती. डॉक्टरांनी त्यांना एक युनिट रक्त चढवले. परंतु, त्यांना एका रक्ताच्या पिशवीची गरज होती. या संपूर्ण प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. यानंतर हेलिकॉप्टरने रक्त आणण्याची तयारी करण्यात आली. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरने रक्त घेऊन जाणे अवघड झाले होते. अखेर हवामानात बदल झाल्यानंतर कर्मचारी गडचिरोलीहून रक्त घेऊन भामरागडला रवाना झाले.

जिल्हा प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक

संबंधित महिलेपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्हा पोलीस दलाचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्यात आले. पूर संकटाच्या वेळी तत्परता दाखवत वैद्यकीय पथक रक्ताची पिशवी घेऊन रुग्णालयाात दाखल झाले आणि महिलेचे प्राण वाचवले. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.

यूट्यूबवर पाहून अल्पवयीन नातीची घरीच केली प्रसूती

अनैतिक संबंधातून गर्भवती झालेल्या नातीची आजीने यूट्यूबवर व्हिडिओ पाहून घरीच प्रसूती केली. यानंतर नवजात अर्भकाला कचऱ्यात फेकून दिले. बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून बाळाला रुग्णालयात दाखल केले.या प्रकरणी उत्तम नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner