Jalna MIDC Blast : जालन्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, २० कामगार जखमी; ३ गंभीर-blast in steel company at midc jalna 20 injured 3 critically ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jalna MIDC Blast : जालन्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, २० कामगार जखमी; ३ गंभीर

Jalna MIDC Blast : जालन्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, २० कामगार जखमी; ३ गंभीर

Aug 24, 2024 03:30 PM IST

Jalna MIDC Blast : जालना औद्योगिक वसाहतीमधील एका स्टील कंपनीत झालेल्या स्फोटात कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

जालन्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट
जालन्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट

Blast in steel company Jalna : जालन्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली असून गजकेसरी स्टील नावाच्या कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत २० कामगार जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये विस्फोट झाल्याने वितळलेले लोखंड अंगावर पडल्याने २० जण जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. कज केसरी या स्टील कंपनीत दुपारच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. या स्फोटात काही कामगारांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मात्र प्रशासनाने याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. या घटनेनंतर पोलिसांनीही घटनास्थळी जात कंपनीची पाहणी केली. बॉयलरमध्ये स्फोट कसा झाला, याचे कारण समोर आलेले नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार जालना औद्योगिक वसाहतीमधील गजकेसरी स्टील कंपनीमध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला. लोखंड वितळणाऱ्या बॉयलरचा विस्फोट झाल्याने अनेक कामगार जखमी झाले. या दुर्घटनेत २० ते २५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्टील कंपनीत लोखंड वितळवण्याच्या भट्टीत पातळ धातूमध्ये वरून घन धातू टाकल्यानं सर्व बॉयलरमधील धातू बाहेर उडाला. यामुळे भट्टीचा स्फोट झाला. या भट्टीच्या आजूबाजूला अनेक मजूर काम करत होते. जवळपास २० कामगार या घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील ओम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह, बचाव पथकाने धाव घेत जखमींना कंपनीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. दुर्घटनेत कमीत कमी २० कामगार जखमी झाले असून यांपैकी ३ ते ४ जण गंभीर आहेत. घटनास्थळासह, रुग्णालयात पोलीस दाखल झाले असून कामगार व प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवला जात आहे.

विभाग