मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Badlapur Factory blast : बदलापूरजवळ केमिकल फॅक्टरीत स्फोट; १ ठार, ४ जखमी

Badlapur Factory blast : बदलापूरजवळ केमिकल फॅक्टरीत स्फोट; १ ठार, ४ जखमी

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Jan 18, 2024 10:46 AM IST

Badlapur Kharvai MIDC Factory blast News : कारखान्यात झालेल्या या साखळी स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

Fire at a chemical factory in Badlapur MIDC.
Fire at a chemical factory in Badlapur MIDC. (ANI)

Badlapur Factory blast : ठाणे जिल्ह्यात बदलापूर येथील खरवई एमआयडीसी परिसरात एका केमिकल कारखान्यात एका पाठोपाठ एक स्फोट झाले आहेत. कारखान्यात झालेल्या या साखळी स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारखान्यातील आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत.

कुळगाव-बदलापूर अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार कारखान्यात एका ड्रममध्ये भरलेल्या काही रसायनांचा स्फोट होऊन ही आग लागली आहे. स्फोटांमुळे कारखान्याबाहेर उभ्या असलेल्या टेम्पो आणि वाहनांनाही आग लागली आहे. हे स्फोट इतके जबरदस्त होते की कारखान्यापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटाचे आवाज ऐकू येत होते, अशी माहिती सोनवणे यांनी दिली. या दुर्घटनेत मृत कामगाराची अद्याप ओळख पटलेली नाही.

दरम्यान, कारखान्यातील रिअॅक्टरला आग लागली आणि त्याचे काही भाग कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात सुमारे अर्धा किलोमीटर फेकले गेल्याचे समजते. आगीचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे. 

या आगीमुळे कारखान्यातील किती नुकसान झाले आहे याचा अंदाज घेण्याचे काम सध्या अधिकारी करत आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच…

WhatsApp channel