Pune Black magic crime news : पुरोगामी पुण्याला काळिमा फसवणारी आणखी एक घटना उघडकीस आली आहे. एका सोसायटीत किरकोळ कारणावरून वाद झाल्याने एकावर काळी जादू करण्यात आली. सोसायटीचा सेक्रेटरी व त्याच्या मुलाने तंत्रमंत्राच्या सहाय्याने काळी बाहुली पेटलवी. कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
सोसायटीचे सेक्रेटरी राजकुमार जोशी व त्यांचा मुलगा अंकुर जोशी (रा. पिकासो पॅराडाईज अपार्टमेंट, सह्याद्री पार्क, साळुंखे विहार, कोंढवा) असे आरोपींचे नाव असून यांच्या विरोधात जादूटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी रुपेश अग्रवाल (वय ४६, रा. कोंढवा) यांनी तक्रार दिली आहे. रुपेश अग्रवाल व सोसायटीचे सेक्रेटरी राजकुमार जोशी व त्यांचा मुलगा अंकुर जोशी हे कोंढव्यातील पिकासो पॅराडाईज अपार्टमेंट, सह्याद्री पार्क, साळुंखे विहार या सोसायटीत राहतात. रुपेश अग्रवाल आणि त्यांचे वडील राजेंद्र अग्रवाल हे १४ मार्चला सकाळी ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघाले असतांना सोसायटीचे गेट उघडण्यासाठी वॉचमन नअसल्याने याची तक्रार त्यांनी सेक्रेटरी राजकुमार जोशी यांच्याकडे केली. तसेच वॉचमन गेटवर का नाही? असा जाब देखील विचारला. यावर जोशी यांनी वॉचमन माझी गाडी धुण्यासाठी दुसऱ्या सोसायटीत गेल्याचे त्यांनी सांगितले. यावर सेक्रेटरी राजकुमार जोशी यांना 'वॉचमनला तुम्ही वैयक्तिक कामासाठी का पाठवता'? याचा जाब विचारल्याने जोशी यांना अगरवाल यांचा राग आला.
यावरून जोशी यांचा मुलगा अंकुर जोशी याने तक्रारदार व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ केली. तसेच दोघांना बघुन घेतो अशी धमकी देखील दिली. अगरवाल यांच्या विरोधात खोटा गुन्हा देखील आरोपीने दाखल केला. तक्रारदार अगरवाल यांच्या कुटूंबीयांना मानसिक त्रास देखील दिला. ऐवढेच aही तर अंकुर जोशी याने काळी जादू करत तसेच तक्रारदार यांना त्रास देण्यासाठी गेटवर लिंबु ठेवुन व स्वस्तिक बर काळी बाहुली जाळुन जादुटोणा करत अघोरी कृत्य केले. यामुळे अग्रवाल यांच्या कुटुंबियांनी थेट पोलिस ठाणे गाठत कोंढवा पोलिसांना या बाबत तक्रार दिली. पोलिसांनी देखील घटनास्थळी येत पाहणी केली. यानंतर त्यांनी अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला.
सतत होणाऱ्या या मानसिक त्रासामुळे तक्रारदार यांचे मोठे भाऊ राकेश अग्रवाल यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. या पार्श्वभूमीवर सेक्रेटरी राजकुमार जोशी व त्यांचा मुलगा अंकुर जोशी यांच्या विरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
'जोशी यांनी आपल्याला त्रास देण्यासाठी सोसायटीच्या प्रवेशद्वारावर लिंबू ठेवले. त्यांनी काळी बाहुली जाळून धमकावले. त्यांनी असे अघोरी कृत्य केल्याने आमचे कुटुंबीय घाबरले. जोशी यांनी आपला मोठा भाऊ राकेश आणि मामा किशनचंद अग्रवाल यांचा पाठलाग करून दहशत निर्माण केली. यामुळे राकेश यांना हृदयविकाराचा झटका आला,' असे अग्रवाल यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
संबंधित बातम्या