मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  VIDEO : मनोज जरांगे यांच्या जुन्या सहकाऱ्याचे आधी शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत अन् नंतर तोंडाला फासलं काळं

VIDEO : मनोज जरांगे यांच्या जुन्या सहकाऱ्याचे आधी शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत अन् नंतर तोंडाला फासलं काळं

Jun 24, 2024 06:20 PM IST

Maratha Reservation Protest : रुग्णालयात पेशंट तपासात असताना चार ते पाच आंदोलक त्यांच्या केबिनमध्ये शिरले. त्यांना डॉ. रमेश तारख यांना पकडून त्यांच्या तोंडाला काळं फासलं.

मनोज जरांगेंना विरोध करणाऱ्यांच्या तोंडाला काळं फासलं.
मनोज जरांगेंना विरोध करणाऱ्यांच्या तोंडाला काळं फासलं.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाला परवानगी देऊ नये, असे निवदेन डॉ. रमेश तारख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या रागातून ४ ते ५ मराठा आंदोलकांनी डॉ. रमेश तारख यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांच्या तोंडाला काळं फासलं आहे. विशेष म्हणजे आंदोलकांनी आधी शाल, फुलांचा गुच्छ देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांना पकडून ठेवला त्यांच्या चेहऱ्याला काळी शाई लावली. यावेळी जरांगे यांना विरोध का करता, असा जाबही आंदोलकांनी विचारला. तारख यांच्या तोंडाला काळे फासणारे कार्यकर्ते झुंजार छावा संघटनेचे पदाधिकारी असल्याची माहिती आहे.

 

ट्रेंडिंग न्यूज

मनोज जरांगे यांच्यासोबत आंदोलनात सक्रिय असलेले डॉ. तारख फेब्रुवारी महिन्यापासून मराठा आंदोलना पासून दुरावले आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण करण्याचा निर्धार केल्यानंतर त्यांना परवानगी देऊ नये, असे निवदेन अंतरवाली सराटी गावातील काहींनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यात डॉ.  रमेश तारख हे देखील होते. निवेदन देऊन जातीच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे मराठा आंदोलक तारख यांच्यावर संतप्त होते.

सोमवारी दुपारी काही आंदोलकांनी डॉ. रमेश तारख यांना फोन करून एका पेशंटला दाखविण्यासाठी येत असल्याचे सांगितले. रुग्णालयात पेशंट तपासात असताना चार ते पाच आंदोलक त्यांच्या केबिनमध्ये शिरले. तुमचा वाढदिवस आहे, म्हणत शाल, पुष्पगुच्छ देत त्यांना घेराव घातला. डॉ. तारख यांनीआपला आज वाढदिवस नसल्याचे सांगितले मात्र एकाने त्यांच्या केबिनचादरवाजा बंद केला. तर दोघांनी त्यांना पकडून ठेवले. बाकीच्या आंदोलकांनी त्यांच्या तोंडाला काळे फासले. जातीच्या विरोधात का जातो, उपोषणास परवानगी देऊ नका म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन का दिले, असा जाब विचारत आंदोलक तेथून निघून गेले.

मराठा आरक्षणासाठी संघर्षकर्ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समाजातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मात्र ओबीसी आंदोलन सुरू झाल्यानंतर राजकीय नेत्यांसह काहीजण थेट भूमिका घेऊन जरांगे यांच्या मागणीला विरोधही करत आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे म्हणजे मराठा समाज नाही, असे म्हटले होते. त्यानंतर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेने आक्रमक भूमिका घेत विखे पाटील यांनामहाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता कधीकाळी मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेल्या तसेच मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय असलेल्याडॉ. रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं आहे. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

दरम्यान रमेश तारख यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध करणारे पत्र मी लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे दोन महिन्यापूर्वी दिले. त्यानंतर आज ही घटना घडली. आज सकाळी पेशंट म्हणून हे लोक माझ्याकडे आले. तसेच, वाढदिवस म्हणून सत्कार करतो म्हणाले. त्यांना ज वाढदिवस नसल्याचे सांगितले तरही त्यांनी माझा सत्कार केला. त्यानंतर, चेहऱ्यावर काळी शाई फासली. यामागे कोण आहे, याची चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. तारक यांनी केली आहे.

WhatsApp channel